शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्त्यावरही धावणार बीआरटी?

By admin | Updated: September 27, 2016 04:33 IST

औंध ते जंगली महाराज रस्ता आणि संगमवाडी ते महापालिका भवन या मार्गावरील बीआरटी मार्गाचे काम सुरू केल्यानंतर आता प्रशासनाकडून लवकरच सिंहगड रस्त्यावरही

पुणे : औंध ते जंगली महाराज रस्ता आणि संगमवाडी ते महापालिका भवन या मार्गावरील बीआरटी मार्गाचे काम सुरू केल्यानंतर आता प्रशासनाकडून लवकरच सिंहगड रस्त्यावरही बीआरटी सुरू केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी या रस्त्याच्या रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीकडून हाती घेण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आधीच गर्दीने गजबजलेल्या सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावलेला असतानाच; या मार्गावर बीआरटी धावणे शक्य आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. केंद्र शासनाच्या जेएनएनयूएनआरएम योजनेअंतर्गत महापालिकेने बीआरटी मार्गांच्या उभारणीसाठी सुमारे ११२ हून अधिक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आलेले आहे. मात्र, त्यातील केवळ ३० किलोमीटर मार्गावर अद्यापपर्यंत बीआरटी सुरू केली आहे. त्यामुळे उर्वरित मार्गावर टप्प्याटप्प्याने बीआरटी सुरू करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच संगमवाडी ते विश्रांतवाडी आणि संगमवाडी ते वाघोली या मार्गावर बीआरटीसेवा सुरू करण्यात आली असून पुढील टप्प्यात औंध ते महापालिका भवन जंगली महाराज रस्त्यामार्गे, तर संगमवाडी ते शिवाजीनगर आणि महापालिका भवन असा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीचे कामही प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याचा पुढच्या टप्प्यात आता प्रशासनाकडून सिंहगड रस्त्याचे नियोजन हाती घेण्यात आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)झाला होता विरोध महापालिका प्रशासनाकडून २०११ मध्ये या मार्गावर बीआरटी सुरू करण्यास मान्यता दिली होती. मात्र, त्या वेळी या परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी बीआरटी मार्गास विरोध केला होता. त्यानंतर या नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनेही केली होती. त्यातच पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा विषय आल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मार्गावर बीआरटीची रचना कशी असेल, याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आले असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. स्वारगेट बस स्थानकापासून ते पुणे-बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलापर्यंत हा मार्ग प्रस्तावित असल्याचेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेने बीआरटी मार्गांच्या उभारणीसाठी सुमारे ११२ हून अधिक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. सिंहगड रस्त्याच्या रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीकडून हाती घेण्यात आले आहे़