पाटस परिसरातील अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:10 IST2021-03-21T04:10:42+5:302021-03-21T04:10:42+5:30

तात्याराम राऊत ( वय ३३, रा. लाखेवाडी , ता. इंदापूर ) , नवनाथ जाधव ( वय ३५, रा. नीर ...

Both died in an accident in Patas area | पाटस परिसरातील अपघातात दोघांचा मृत्यू

पाटस परिसरातील अपघातात दोघांचा मृत्यू

तात्याराम राऊत ( वय ३३, रा. लाखेवाडी , ता. इंदापूर ) , नवनाथ जाधव ( वय ३५, रा. नीर निमगाव , ता. इंदापूर ) या दोघा युवकांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार ( दि. १९ ) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. दोन्ही युवक यवत येथून इंदापूरला दुचाकीने निघाले होते. दरम्यान रस्त्याला दुभाजक असतांना देखील मार्ग बदलून चुकीच्या दिशेने समोरुन मालवाहतूक वाहन येत असतांना या वाहनाने दुचाकीला जोराची समोरुन धडक दिली. अपघात झाल्यावर मोठा आवाज झाला तर दुचाकीवरील युवक गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आपघाता नंतर चालक फरार झाला तर परिसरातील लोकांनी तसेच पाटस पोलीसांनी जखमी युवकांना तातडीने दौंड येथील ऊपजिल्हा रुग्णालयात नेले माञ ऊपचारापूर्वी या दोघांचा मृत्यू झाला

Web Title: Both died in an accident in Patas area