शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जामीनदार होणारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात, वकिलांवर गुन्हा दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 09:27 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे काही वकील आरोपीला जामीन मिळवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

पुणे : न्यायालयात बनावट रेशनकार्ड, आधार कार्ड तयार करुन बोगस जामीनदार होणा-या टोळीला गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी न्यायालयात आवारात छापा घालून पकडले. गुन्हे शाखेने या टोळीतील १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बनावट रेशनकार्ड, आधार कार्ड जप्त केली आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे काही वकील आरोपीला जामीन मिळवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन मंगळवारी पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात छापा घालून १० संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड जप्त केली आहे.

या बोगस जामीनदारांकडे चौकशी केल्यावर काही जण त्यांना बनावट आधार कार्ड तयार करुन देत असल्याची माहिती मिळाली. आधार कार्डवर नाव एकाचे तर, फोटो दुस-याचा असा प्रकारही चौकशीत पुढे आला आहे. हे बनावट जामीनदार असल्याचे माहिती असतानाही आरोपीचे जामीनपत्र घेऊन काही वकील जामीन करुन देत असल्याची माहिती त्यातून पुढे आली आहे.

या टोळीतील १० जणांकडे काल रात्रभर चौकशी करण्यात येत होती. रात्री उशिरा याबाबत गुन्हे दाखल करण्यात येणार होता. याबाबत आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात काही वकिलांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचे समजते.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी