डोळे बांधून जादुगाराने पुण्यातून चालवली बाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:08+5:302021-02-05T05:03:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ण चेहरा झाकून, डोळे बांधून मोटारसायकलवरुन पुण्याच्या रस्त्यावरुन बाईक चालवण्याचा ‘स्टंट’ पुण्यातील जादूगार ...

A blindfolded magician rode a bike through Pune | डोळे बांधून जादुगाराने पुण्यातून चालवली बाईक

डोळे बांधून जादुगाराने पुण्यातून चालवली बाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्ण चेहरा झाकून, डोळे बांधून मोटारसायकलवरुन पुण्याच्या रस्त्यावरुन बाईक चालवण्याचा ‘स्टंट’ पुण्यातील जादूगार प्रसाद कुलकर्णी यांनी केला. यावेळी त्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त कुलकर्णी यांनी डोळे बांधून मोटारसायकल चालवण्याचा प्रयोग केला. सकाळी अकरा वाजता सारसबाग येथून प्रयोगाला सुरुवात झाली. बाजीराव रस्त्यावरून साडेतीन किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून शनिवारवाड्यापाशी त्यांचा प्रयोग पूर्ण झाला. गाडी चालवताना प्रसाद कुठेही डगमगला नाही. या दरम्यानच्या चार ‘सिग्नलला’ही तो बरोबर थांबला. पुण्यामध्ये मुख्य रस्त्यावर असा प्रयोग पहिल्यांदाच झाला.

प्रयोग सुरू होताना उपस्थितांनी पुष्पहार घालून प्रसादचा सत्कार केला. रस्त्याच्या दुतर्फा या प्रयोगाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. प्रयोग पूर्ण होताच प्रसादचे कौतुक करण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो टिपण्यासाठी शनिवारवाड्यापाशी गर्दी झाली होती. ‘वाहतुकीचे नियम पाळा’, असे तो प्रत्येकाला सांगत होता. प्रसादने सातव्या वर्षांपासून आत्तापर्यंत जादूचे सुमारे दहा हजार प्रयोग केले आहेत.

Web Title: A blindfolded magician rode a bike through Pune