शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Big breaking ! पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह, मात्र तब्येत स्थिर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 19:17 IST

उपचार घेऊन लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा बोलून दाखविला निर्धार

ठळक मुद्देरुग्णालयात दाखल : ट्विटरवरून स्वतःच दिली माहिती

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच ट्विट करून दिली असून उपचार घेऊन लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.शहरात कोरोनाचा फैलाव झाल्यापासून मोहोळ दिवसरात्र काम करीत आहेत. विशेषतः वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयांशी बोलणी करून त्यांच्याशी उपचारांबाबत करारनामे करणे, शहराच्या विविध भागांतील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करणे, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणे, त्यादृष्टीने आर्थिक तरतूदीपासून सर्व वैद्यकीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोहोळ यांनी कष्ट घेतले. सातत्याने रुग्णालयांना भेटी देणे, विविध मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सामील होणे, स्वतः बैठकी घेणे अशी कामेही सुरूच होती. या काळात त्यांची पालिकेतील दैनंदिन कामेही सुरूच होती. अनेक नागरिक त्यांना भेटायला येत होते.दरम्यान, मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकारयांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील पाहणी केली होती. या कालावधीत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली होती. परंतु ही तपासणी निगेटिव्ह आली होती. यापूर्वी त्यांना किरकोळ सर्दी, खोकला होणे असा त्रास झालेला होता. परंतु, दरवेळी टेस्ट निगेटिव्ह आली. दरम्यान, ताप आल्याने त्यांनी पुन्हा कोरोना टेस्ट करून घेतली. ही टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली. ते खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले असून लवकरच बरा होऊन पुणेकरांच्या सेवेत हजर होईन असे महापौरांनी ट्विट केले आहे.------------थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोना टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.- मुरलीधर मोहोळ, महापौर

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौर