शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

भोरला रस्त्यांची कामे रखडली

By admin | Updated: June 2, 2014 01:16 IST

पावसाळा तोंडावर आला, तरी मागील तीन महिन्यांपासून वर्कआॅर्डर मिळूनही भोर नगरपलिकेकडून मंजूर सुमारे अडीच कोटी रुपयांपैकी दीड कोटी रुपयांची रस्त्याची कामे रखडली आहेत

भोर : पावसाळा तोंडावर आला, तरी मागील तीन महिन्यांपासून वर्कआॅर्डर मिळूनही भोर नगरपलिकेकडून मंजूर सुमारे अडीच कोटी रुपयांपैकी दीड कोटी रुपयांची रस्त्याची कामे रखडली आहेत. सदर कामांचे सुपरव्हिजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्याने स्थानिक ठेकेदारांचा काम करण्यास नकार, तर नगरपालिका प्रशासनाकडून संबंधित कामांचे टेंडर रद्द करून नव्याने निविदा मागवण्याचा विचार आहे. मात्र, तोपर्यंत पावसाळा आल्याने रस्त्यांची कामे मात्र होणार नाहीत, हे नक्की. ठेकेदारांच्या अडमुठे धोरणाबाबत नागरिकांच्या तीव्र येत आहेत. रस्त्यांची कामे पेव्हर मशिनद्वारे करावयाची आहेत. बी.बी. एम कारपेट सिलकोट असे कामाचे स्वरूप आहे. त्यासाठी व्हायब्रोटर रोलरचा वापर करून आधुनिक पद्धतीने कामे करावयाची आहेत. भोर शहरातील काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके ठेकेदारांना स्वत:च्या नावावर कामे करता येतात. इतर दुसर्‍याच नावावर कामे करतात, त्यांना लायसन नाही. नगरपालिकेचा बांधकाम विभागाकडून कामांकडे अधिक लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे कामांचा दर्जा राहत नव्हता. एक वर्षाच्या आत रस्ते खराब होत होते. यामुळे या वेळी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतली जाणार आहेत. कामाचा दर्जा राखावा लागेल. निकृष्ट काम करता येणार नाही. या भीतीमुळे सुमारे दीड कोटीची कामे रखडली आहेत. ठेकेदाराने बांधकाम विभागाकडे कामे देण्यास विरोध केल्याचे समजते. याबाबत बैठका होऊनही कोणताच तोडगा निघाला नाही. पावसाळा आल्याने कामे रखडणार. नगरपालिका प्रशासनाकडून सदरच्या कामांचे नव्याने निविदा मागवून पुन्हा टेंडर काढणार असल्याचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)