भावेश सोलंकी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST2021-06-18T04:09:19+5:302021-06-18T04:09:19+5:30

पुणे : युवा उद्योजक, केनशा मोबाईल शॉपीचे संचालक भावेश रमणलाल सोलंकी (वय ३९) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ...

Bhavesh Solanki passed away | भावेश सोलंकी निधन

भावेश सोलंकी निधन

पुणे : युवा उद्योजक, केनशा मोबाईल शॉपीचे संचालक भावेश रमणलाल सोलंकी (वय ३९) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे वडील, पत्नी, मुलगा, दोन विवाहित बहिणींसह मोठा गोतावळा आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे विमल संघवी यांनी कळवले आहे.

ते ऑल इंडिया मोबाईल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी होते. भावेश यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोबाईल हँडसेट विक्री व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीत मोठी झेप घेतली. पुणे मोबाईल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, श्री अजितनाथ जैन श्वेताम्बर टेम्पल ट्रस्टचे विश्वस्त, श्री अजितनाथ जैन युवा ग्रुपचे संस्थापक, गब्बर डिलचे सीईओ अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. स्टेशनरी कटलरी व जनरल असोसिएशनने त्यांचा ʻबेस्ट सेल्समनʼ पुरस्काराने गौरव केला होता. तसेच अनेक मोबाईल कंपन्यांनी पुरस्कार प्रदान केले होते. मोबाईल व्यावसायिकांसाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. परिणामी अल्पावधीत ते देश पातळीवर संघटनेत काम करू लागले. भावेश यांच्या निधनामुळे गुरूवारी शहरातील सर्व मोबाईल शॉपीसह अन्य व्यावसायिकांनीही उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली.

Web Title: Bhavesh Solanki passed away