शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भरत चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द

By admin | Updated: August 27, 2015 04:54 IST

कोंढवा येथील प्रभाग क्रमांक ६३ अ मधून इतर मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांनी निवडणूक लढविताना दिलेले जात प्रमाणपत्र अवैध आढळून

पुणे : कोंढवा येथील प्रभाग क्रमांक ६३ अ मधून इतर मागासवर्ग प्रवर्गातून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक भरत चौधरी यांनी निवडणूक लढविताना दिलेले जात प्रमाणपत्र अवैध आढळून आल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची सभागृहातील संख्या १६ वरून १५ इतकी झाली आहे.महापालिकेच्या २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये इतर मागास वर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरून भरत चौधरी निवडून आले. त्या वेळी त्यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोहंमद खान यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राला आक्षेप घेऊन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती.जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौधरी यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करून ते अवैध असल्याचा निर्णय दिला. लेखी पत्र मिळाल्यानंतर कुणाल कुमार यांनी निवडणूक अधिनियमातील तरतुदींना अनुसरून चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द करीत असल्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे भरत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांनी दबावाखाली येऊन निर्णय घेतल्याचा आरोप चौधरी यांनी केला.