शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... पुण्यावर सीसीटीव्हींची नजर

By admin | Updated: August 9, 2015 03:59 IST

पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही मॉनिटरिंग रूममधून एका सहायक आयुक्तासह तीन अधिकारी आणि तब्बल २५ प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची पुणे

पुणे : पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही मॉनिटरिंग रूममधून एका सहायक आयुक्तासह तीन अधिकारी आणि तब्बल २५ प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर राहणार आहे़ सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागणारे ‘स्ट्रीट क्राईम’, बॉम्बस्फोट, खून, घरफोड्या, अपघात, सोनसाखळी चोऱ्यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासासोबतच वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना या सीसीटीव्ही प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे. तब्बल २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. १३ आॅगस्ट २०१० रोजीचा जर्मन बेकरीचा बॉम्बस्फोट उघडकीस आणण्यात आणि त्यामागे इंडियन मुजाहिदीनचा यासिन भटकळ असल्याचे सीसीटीव्हीमुळेच उघडकीस येऊ शकले होते. त्यानंतर १ आॅगस्ट २०१२ रोजी जंगली महाराज रस्त्यावर साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. २० आॅगस्ट २०१३ रोजी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात येत होती. राज्य शासनाने पुण्यामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून या कामाला सुरुवातही केली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या अधिकाऱ्यांसह संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी वारंवार बैठका घेऊन हे काम शेवटी मार्गी लावले. पुणेकरांची सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे या सीसीटीव्ही प्रकल्पाला वेगळे महत्त्व आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या १२५० कॅमेऱ्यांची ‘झूम क्वालिटी’ उत्कृष्ट दर्जाची आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये मुख्य नियंत्रण कक्ष (मॉनिटरिंग रूम) तयार करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षासाठी पोलीस निरीक्षक सीमा मेहेंदळे, सहायक निरीक्षक शैलजा बोबडे यांच्यासह २५ प्रशिक्षित आणि अनुभवी पोलीस कर्मचारी २४ तास लक्ष ठेवून असणार आहेत. या नियंत्रण कक्षासाठी सहायक पोलीस आयुक्त मोहन मोहाडीकर यांचे पर्यवेक्षण राहणार आहे. वाहतूक नियमभंगाच्या दररोज १५० केसेससीसीटीव्हीद्वारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून, दिवसाला साधारणपणे १५० वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या बेदरकार वाहनचालकांचे फुटेज आरटीओकडे पाठवण्यात येते. आरटीओमार्फत या वाहनचालकांकडून चलन फाडण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त मोहन मोहाडीकर यांनी दिली. कसे ठेवले जाणार लक्ष?मॉनिटरिंग रूममध्ये साधारणपणे १० बाय २० फुटांची ‘व्हिडिओ वॉल’ बसवण्यात आली आहे. या व्हिडिओ वॉलवर ८ मोठ्या स्क्रिन एकाच वेळी बघता येतात. हवी ती स्क्रिन मोठी करून पाहता येते. कॅमेऱ्यांची झूम क्वालिटी उत्कृष्ट असल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या छातीवरची नेमप्लेटही वाचता येऊ शकते. यासोबतच कक्षामध्ये २० संगणकांवर पोलीस कर्मचारी कायम लक्ष ठेवणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शिक्षणाचे माहेरघर, उद्योगनगरी, आयटी सिटी, चित्रपट निर्मिती अशा क्षेत्रांत पुणे अग्रेसर आहे. शहराचा पसारा वाढत असताना, नागरिकांच्या समस्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी ही सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. स्मार्ट पोलिसिंगची संकल्पना यामधून साध्य होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पाठपुराव्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित झाली. मुंबईच्या एका परिमंडळात नोव्हेंबरपर्यंत तर संपूर्ण मुंबईत पुढील वर्षीच्या आॅक्टोबरपर्यंत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीपोलिसांच्या पारंपरिक कार्यपद्धतीबरोबरच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, त्याचा वापर गुन्हे रोखण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासासाठी करणे आवश्यक झाले आहे. बदलत्या काळात पोलिसिंगचे संदर्भही बदलत चालले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही प्रकल्प हा पोलिसांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. - के. के. पाठक (पोलीस आयुक्त, पुणे)