शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचा चेहरामोहरा बदलणार! नगरपरिषदेच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे ‘बजेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 18:58 IST

कोणतीही करवाढ,दरवाढ नसलेल्या या बजेटमध्ये बारामतीकरांवर विविध प्रकल्पांचा अक्षरश: वर्षाव...

ठळक मुद्दे१०३४ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर 

बारामती: बारामती नगरपरीषदेच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे  १५६ वे ‘बजेट’ गुरुवारी( दि. २५) सादर करण्यात आले. १०३४  कोटी ५५ लक्ष ३७ हजार १०१ रुपयांचे बजेटचा यामध्ये समावेश आहे. यावेळी १२०१ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. त्यानुसार या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीनंतर बारामतीचा चेहरामोहरा बदलुन जाणार आहे. कोणतीही करवाढ,दरवाढ नसलेल्या या बजेटमध्ये बारामतीकरांवर विविध प्रकल्पांचा अक्षरश: वर्षाव करण्यात आला आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडलेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत माहिती दिली. बृहन्महाराष्ट्र पाणी योजना,शिवसृष्टी,निरा डावा कालवा सुशोभिकरण,सिटी सेंट्रल पार्क,कऱ्हा नदी सुशोभीकरण आदी प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली.

एमआयडीसीतील कल्याणीपासुन निघणाऱ्या बायपास जोडणाऱ्या रस्त्यासाठी यंदा तरतूद करण्यात आली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या चारही बाजूने जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण,सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बारामती शहरात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी चार साठवण तलाव आहेत.या चार तलावांशिवाय आणखी दोन साठवण तलाव बांधण्यात येणार आहेत.माळावरची देवी मंदिराजवळ तसेच पिंपळी येथील खाणीच्या परिसरात हे तलाव बांधण्यात येणार आहेत. हे तलाव पूर्ण झाल्यास निरा डावा कालवा बंद झाल्यानंतर देखील बारामतीकरांना सहा महिने पिण्याचे पाणी पुरेल एवढी तरतुद करण्यात आली आहे.

पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी हद्दवाढीत जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.त्यासाठी २५ कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

याशिवाय महिला बालकल्याण,अपंग कल्याण,झोपडपट्टी निर्मुलन, जुनी मंडई विकसित करणे,वसंतराव पवार नाट्यगृह विकसित करणे,मुस्लीम समाज सभागृह,उर्दू शाळेसाठी निधीची तरतूद करण्यात आली.शहरातील जुने गावठाण रस्ते विकसित करण्यात येणार आहे.त्यासाठी २५ कोटीं खर्च करण्यात येणार आहेत. सीएसआर मधुन तांदुळवाडी,जळोची,सेंट्रल बिल्डींग परीसर,निरा रस्ता येथे उद्यान विकसित करण्यात येणार आहेत. याशिवाय ३ नवीन सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक गुजर यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीBudgetअर्थसंकल्पAjit Pawarअजित पवार