बारामतीचा दुष्काळी डाग कायमस्वरुपी पुसणार? नळपाणी पुरवठा योजनेसाठी निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 04:50 PM2022-04-26T16:50:05+5:302022-04-26T16:50:33+5:30

या मंजुरीनंतर बारामतीचा दुष्काळी डाग कायमस्वरुपी पुसला जाईल?

baramatis drought stain be wiped out permanently approved funding for tap water supply scheme | बारामतीचा दुष्काळी डाग कायमस्वरुपी पुसणार? नळपाणी पुरवठा योजनेसाठी निधी मंजूर

बारामतीचा दुष्काळी डाग कायमस्वरुपी पुसणार? नळपाणी पुरवठा योजनेसाठी निधी मंजूर

Next

बारामती :  बारामती तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने ७९ कोटी ८० लक्ष रक्कमेच्या योजनांना प्रशासकीय मंजूरी मिळालेली आहे. यापूर्वी देखील दोन टप्प्यात कोट्यवधीचा निधी मंजुर झाला आहे. या मंजुरीनंतर बारामतीचा दुष्काळी डाग कायमस्वरुपी पुसणार आहे.

तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास समन्वय समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना उपअभियंता तन्मय कांबळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून या योजनांना मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचे संकल्पनेतून या योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत करण्यात आलेली होती. यामध्ये ५ गावे ४१ वाडया/वस्त्यांचा हा आराखडा बनविण्यात आला होता. या योजनेसाठी पाटबंधारे विभागाकडील जागा साठवण तलाव. जलशध्दीकरण केंद्र व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे.

तसेच निरा-डावा कालवा मधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रितसर परवाना दिला आहे. तसेच या सर्व योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाकी, जलशुध्दीकरण केंद्र, वितरण व्यवस्था, उंच जलकुंभ, पंपहाऊस इ. बाबी बरोबर सदरचे योजनेसाठी सौर उर्जाद्वारे विज उपलब्ध होणार आहे.

या अगोदर दोन टप्प्यात ४४२ कोटी रूपयांच्या ७२ गावांच्या १२ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली आहे. उर्वरित १०५ कोटी रूपयांच्या शिरवली, कांबळेश्वर, मुरूम, कोहाळे खुर्द, कोहाळे बु, मेखळी. सोनगांव या नवीन प्रादेशिक योजना प्रस्तावित पाणी पुरवठा खात्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला आहे.

वडगाव निंबाळकर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - २१.६९ कोटी, शिरष्णे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - १०.०८ कोटी, वाणेवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - २०.६१ कोटी, सांगवी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ७.६२ कोटी, वाघळवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - १९.८० कोटी,या पाच योजनांना मंजुरी मिळाली आहे.

Web Title: baramatis drought stain be wiped out permanently approved funding for tap water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.