दारू अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:23+5:302021-09-02T04:22:23+5:30

सांगवी : सांगवी (ता. बारामती) येथे चार ठिकाणी अवैधरीत्या सुरू असणाऱ्या दारू अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांनी धाड टाकून चार ...

Baramati taluka police raid liquor den | दारू अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांचा छापा

दारू अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांचा छापा

सांगवी : सांगवी (ता. बारामती) येथे चार ठिकाणी अवैधरीत्या सुरू असणाऱ्या दारू अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांनी धाड टाकून चार जणांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथे चार ठिकाणी छापा मारून ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या वेळी देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांसह गावठी दारू असा एकूण ३१ हजार ७८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पद्मिनी दत्तू सरवदे, गीता महादेव जगताप, शरीफ आदम शेख, शन्नौ निसार शेख अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत यांनी फिर्याद दिली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी येथील चांदणी चौक व मिलिंदनगर येथे अवैधपणे देशी-विदेशी दारूविक्री सुरू होती. याबाबत पोलिसांनी माहितीच्या आधारे ही कारवाई केली. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस हवालदार रावसाहेब गायकवाड, पोलीस नाईक राजेंद्र काळे, प्रशांत राऊत यांनी ही कारवाई करत दारूचा साठा जप्त केला आहे.

Web Title: Baramati taluka police raid liquor den