शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत रविवारी होणार जनआक्रोश मोर्चा; देशमुख कुटुंबिय होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:15 IST

Santosh Deshmukh Murder Morcha: स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.

बारामती स्व. संतोष देशमुख यांच्या निघून हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने बारामतीत शनिवारी (दि ८) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता हा मोर्चा रविवारी (दि ९) होणार आहे.यावेळी मोर्चामध्ये देशमुख कुटुंबिय सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

बारामती शहरात शनिवारी(दि ८) जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.मराठा समाजाने या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील जिजाऊ भवन येथे तातडीने बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी मोर्चाच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी बारामती बंद आणि सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, स्व. संतोष देशमुख यांचा महिना (श्रद्धांजलीचा दिवस) हा ८ मार्च रोजी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना या मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही. त्यांच्या भावना विचारात घेऊन आणि त्यांना या आंदोलनात सामील होता यावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा आयोजित निषेध मोर्चा रविवारी (दि ९) आयोजित करण्यात आला आहे.

या मोचमिध्ये स्व. संतोष देशमुख यांचे बंधु, मुलगी आणि इतर कुटुंबीय देखील सहभागी होणार आहेत. हा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मोर्चा सुरु होणार आहे.कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला सुरवात होइल.संतोष देशमुख यांच्या हत्येचे दु:ख झालेले सर्व जाती धर्माचे नागरीक मोर्चात सहभागी होतील.मोर्चा नेहमीच्या मार्गाने भिगवण चाैक येथे दाखल होईल.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBaramatiबारामतीBeedबीडmarathaमराठा