बारामती परिसरात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवरच हल्ला; ४ अधिकाऱ्यांसह ,पाच कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 05:39 PM2020-03-27T17:39:06+5:302020-03-27T17:41:02+5:30

नागरिकांनी दगड ,काठ्या,लोखंडी रॉड ने पोलिसांवर हल्ला चढविला.

Baramati Home Quarantined Citizens Attack on the Police, 5 Officers, Five Workers Injured | बारामती परिसरात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवरच हल्ला; ४ अधिकाऱ्यांसह ,पाच कर्मचारी जखमी

बारामती परिसरात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवरच हल्ला; ४ अधिकाऱ्यांसह ,पाच कर्मचारी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देबारामती परिसरातील जळोची येथील घटना

बारामती: बारामती शहर परिसरातील जळोची येथे होम क्वारंटाईन केलेल्या नागरीकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी(दि २७) दुपारी २ च्या सुमारास घडली.या घटनेमध्ये ४ पोलीस अधिकारी,५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.जखमींमध्ये २ महिला पोलीस अधिकाऱ्यांसह एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जळोची परिसरातील काही नागरीकांना वैद्यकीय विभागाने होम क्वारंटाईन केले आहे.तसा शिक्का देखील या नागरिकांच्या हातावर मारण्यात आला आहे.शुक्रवारी दुपारी हे होम कॉरंटाईन केलेले नागरीक परिसरात फिरत होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी या क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना बाहेर फिरु नका,असे सुचित करुन हटकले.या वरुन स्थानिक नागरीक आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला.  या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली.सुरवातीला पोलिसांनी दोन्ही गटाला समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला.मात्र,याच वेळी होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या गटाने पोलीसांवर हल्ला चढविला. या नागरिकांनी दगड ,काठ्या,लोखंडी रॉड ने पोलीसांवर हल्ला चढविला. यामध्ये शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले,सहायक पोलीस निरीक्षक योगेश शेलार,सहायक पोलीस निरीक्षक आश्वीनी शेंडगे,पोलीस कर्मचारी पोपट नाळे, पोपट कोकाटे,सिध्देश पाटील ,महिला पोलीस कर्मचारी स्वाती काजळे, रचना काळे यांचा समावेश आहे.जखमी पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना पायाला,हाताला तसेच डोक्याला दुखापत झाली आहे.आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Web Title: Baramati Home Quarantined Citizens Attack on the Police, 5 Officers, Five Workers Injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.