शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Bypoll Election: दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला; बारामतीत सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:42 IST

बारामतीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या असून त्यांच्यासह एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासात ८.०१ टक्का इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ८४ ,हजार ५७९ मतदार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान झाले आहे. उन्हाची तीव्रता असल्याने दुसऱ्या टप्प्यात अनेक नागरिक मतदानासाठी बाहेर आल्याचे दिसून आले आहे. 

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज, गुरुवारी (दि. २३) मतदान होत असून, या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासह एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवत असले तरी प्रमुख विरोधी पक्षाचा दमदार उमेदवार नसल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ९० हजार ६८४ महिला, १ लाख ९३ हजार ८७१ पुरुष आणि २४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी ४७८ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, ५७३ ईव्हीएम, ६२१ व्हीव्हीपॅट आणि ५७३ बॅलेट युनिट्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्याचे मतदान केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक दृष्ट्याही महत्त्वाचे ठरणार असून, बारामतीकर कोणाला कौल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Bypoll Sees Increased Voter Turnout; 20.59% Polling by 11 AM

Web Summary : Baramati bypoll witnesses 20.59% voter turnout by 11 AM, up from 8.01% in the initial hours. The election, triggered by Ajit Pawar's demise, features Sunetra Pawar from Mahayuti. With 3.84 lakh voters and 478 centers, results are keenly awaited.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीElectionनिवडणूक 2026Sunetra Pawarसुनेत्रा पवारVotingमतदानMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवार