शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला पावला नाही बाप्पा

By admin | Updated: September 23, 2015 03:20 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शहराध्यक्ष मिळत नसल्याने पक्षाचे इंजिन नेतृत्वाविनाच अडखळत धावत आहे. इच्छुक शहराध्यक्ष झाल्याच्या थाटात शहरात मिरवत आहेत.

मिलिंद कांबळे, पिंपरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शहराध्यक्ष मिळत नसल्याने पक्षाचे इंजिन नेतृत्वाविनाच अडखळत धावत आहे. इच्छुक शहराध्यक्ष झाल्याच्या थाटात शहरात मिरवत आहेत. त्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. या कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काहीजण इतर राजकीय पक्षांच्या मार्गावर आहेत. शहराध्यक्ष मनोज साळुंखे यांचा कार्यकाल संपून, अनेक वर्षेे लोटली आहेत. नवा शहराध्यक्ष निवडीसाठी मुलाखतीचा फार्स तीन ते चार वेळा झाला. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यभराचा दौरा आटोपून सर्वांत शेवटी राज ठाकरे शहरात आले होते. चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये बंद दाराआड त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहराध्यक्षपदाची चाचपणी केली. काही कारणामुळे हा कार्यक्रम अर्ध्यावर टाकत ते निघून गेले होते. त्यांनी शहराध्यक्ष नेमण्याचे वचन दिले. तुमच्यातील एकाचे नाव एकमताने ठरविण्यास सांगितले होते. इच्छुक असलेल्या चार-पाच जणांची मुंबईत ठाकरेंनी स्वत: मुलाखत घेतली. आता कोणत्याही स्थितीत शहराध्यक्ष मिळेल, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, अनेक महिने वाट पाहूनही निवडीची प्रक्रिया अपूर्णच राहिली. सतत मागणी करूनही नेतृत्वाची निवड होत नसल्याने कार्यकर्ते नाराजी पसरली आहे. त्यात राज ठाकरे पुणे शहरात वारंवार येऊन जातात. मात्र, शेजारच्या पिंपरी-चिंचवड शहराकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यांना भेटण्यासाठी थेट मुंबई गाठावी लागते. तेथेही ते भेट देतील, याची शक्यता कमीच आहे. पक्षनेतृत्वाची उदासीनता, त्यात कार्यकर्त्यांमध्ये नसलेला ताळमेळ प्रकर्षाने दिसून येतो. याच स्थितीत मनसेचे भरकटलेले इंजिन शहरात धावत आहे. महापालिकेची निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपली आहे. आता गणेशोत्सवही संपत आला आहे. तरीही शहराध्यक्षाची निवड होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. अखेर कार्यकर्ते गणरायाकडे प्रार्थना करीत आहेत की, शहराध्यक्ष निवडीची बुद्धी नेतेमंडळींना दे.