शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस दंत तंत्रज्ञांवर कारवाईस टाळाटाळ

By admin | Updated: July 8, 2015 02:43 IST

: हलक्या दर्जाचे साहित्य वापरून निकृष्ट दर्जाचे दात, कवळ्या बनवून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस दंत तंत्रज्ञांचा पुण्यात सुळसुळाट झालेला असताना

पुणे : हलक्या दर्जाचे साहित्य वापरून निकृष्ट दर्जाचे दात, कवळ्या बनवून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस दंत तंत्रज्ञांचा पुण्यात सुळसुळाट झालेला असताना, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पुणे महापालिकेला नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील अशा बोगस तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र दंत परिषदेला असतानाही ते कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.पुण्यात सुमारे २५० तर संपूर्ण राज्यात सुमारे साडेतीन हजार बोगस दंत तंत्रज्ञ असल्याचे महाराष्ट्र डेंटल मेकॅनिक्स असोसिएशनने जाहीर केले होते. त्याबाबत महाराष्ट्र दंत परिषदेकडे त्यांनी अनेकदा तक्रारही केली होती. मात्र त्याकडे परिषदेने अनेकदा काणाडोळा केला होता. शेवटी परिषदेने पुणे महापालिकेसह राज्यातील विविध महापालिकांना असोसिएशनची तक्रार आणि त्यांनी दिलेल्या बोगस दंत तंत्रज्ञांची यादी पाठविली होती आणि त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.हा आदेश पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाला. त्यानंतर अशा बोगस दंत तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे अधिकार पुणे महापालिकेला कायद्याने दिले आहेत का, अशी विचारणा आरोग्य विभागाने विधी विभागाला केली होती. विधी विभागाने, बोगस दंत तंत्रज्ञ हे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायद्याअंतर्गत येत नाहीत. त्यामुळे महापालिकेला अशा बोगस दंत तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. अशा बोगस तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र दंत परिषदेला आहेत, असे पत्र पाठवून स्पष्ट केले आहे.