शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

डेंगीची साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 12, 2014 05:30 IST

येथील डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु नागरिक साथीबाबत गांभीर्याने घेत नसल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे.

कोरेगाव भीमा : येथील डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु नागरिक साथीबाबत गांभीर्याने घेत नसल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. १,४०९ घरांची आरोग्य विभागाने तपासणी करून घरांतील साठवलेल्या पाण्यात डेंगीच्या अळ्या मोठ्या प्रमाणावर असल्याची परिस्थिती पाहण्यास मिळाली आहे.कोरेगाव भीमामध्ये डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळल्याने जिल्हा आरोग्य विभागाने तत्काळ फॉगिंग मशिनद्वारे औषध फवारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, साथ आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण गाव डेंगीमुक्त करण्याचे अभियान हाती घेतले आहे. कोरेगाव भीमातील गावठाण हद्दीत दि. १० रोजी १२ फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी सुजाता परदेशी यांनी कोरेगाव भीमामध्ये तात्पुरत्या रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर डेंगीचा ज्या क्षेत्रात जास्त प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी जाऊन पाहणी केली. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने डेंगीच्या साथीबाबत जनजागरण करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये माहिती पत्रकही वाटण्यात आल्याचे सरपंच अशोक काशिद, उपसरपंच नीलेश गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी तानाजी इसवे यांनी सांगितले. नागरिकांनी साठवलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. हे पाणी ओतून देण्यास मात्र नागरिक तयार होत नसल्याने डेंगीच्या निर्मूलनात अडचणी येत असल्याची खंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)