शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

त्याच्यासाठी अटलजी दहा पावले मागे आले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 1:00 AM

एकदा अटलबिहारी वाजपेयी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. पुणे दौºयावरून ते रेल्वेने मुंबईकडे जाणार होते. मी सुद्धा त्यांच्याबरोबर होतो. त्यांना गाडीतून पुणे रेल्वेस्टेशनला सोडले. ते रेल्वेत बसणार तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवले आणि ते दहा पाऊले मागे आले.

एकदा अटलबिहारी वाजपेयी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. पुणे दौºयावरून ते रेल्वेने मुंबईकडे जाणार होते. मी सुद्धा त्यांच्याबरोबर होतो. त्यांना गाडीतून पुणे रेल्वेस्टेशनला सोडले. ते रेल्वेत बसणार तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवले आणि ते दहा पाऊले मागे आले. आम्ही त्यांना विचारलं की कोणाला बोलवायचंय का? कोणाशी बोलायचयं का....? तर ते नाही म्हणाले, आणि दोन दिवस त्यांच्यासोबत जो ड्रायव्हर होता, त्याला नमस्कार चक्रधर, असे ते म्हणाले. एवढा मोठा माणूस दोन दिवसांच्या सहवासात असलेल्या ड्रायव्हरचा सन्मान करतो, यातच त्यांचं किती मोठं मन होतं, याचा प्रत्यय येतो. पुण्यात अटलजी आलेत आणि आम्ही त्यांच्यासोबत नाही, असे झालेच नाही. मंगेशकर हॉस्पिटलचे उद्घाटन, बाबासाहेब पुरंदरेंचा पुण्यभूषण सत्कार, रमणबागेत झालेला गीतरामायणाचा कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांना ते पुण्यात आले होते. संघटनेच्या वाढीसाठी देशभर अटलजी खूप फिरले. जनसंघात अनेक पदे त्यांनी भूषवली. संघटनेच्या बळकटीसाठी एसटी, मोटरसायकलवरूनही ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले आहेत. - गिरीश बापटपालकमंत्री, पुणेसख्ख्या बंधंूचे निधन होऊनही वेळ पाळलीएकदा वेळ दिली की काहीही करून ती पाळायचीच या आपल्या वैशिष्ट्याची ओळख अटलबिहारी वाजपेयी यांनी पुणेकर राजकारण्यांना करून दिली. सुरेश कलमाडी यांनी पुण्यात विकास आघाडी स्थापन केली होती. त्यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला होता. त्यांच्या विरोधात विठ्ठल तुपे उभे होते. वाजपेयी यांनी आम्हाला सभेची वेळ दिली नेमके त्याच्या आदल्या दिवशीच त्यांच्या सख्ख्या बंधूंचे निधन झाले. ते येतील किंवा नाही याबद्दल साशंकता होती, मात्र ते आले, दिलेल्या वेळेत आले व त्यांनी सभेत भाषणही केले. फर्ग्युसन महाविद्यालयाचे मैदान भरून गेले होते. वाजपेयी यांनी कलमाडी यांचे क्रीडा कौशल्य, संघटन कौशल्य, त्याचा देशाला कसा फायदा होईल, अशी सुरुवात करत काँग्रेसवर भरपूर टीका केली. उत्कृष्ट वक्तृत्त्वाचे एक उदाहरण होते. ती त्यांची लोकसभेच्या प्रचारातील अखेरची सभा होती. कलमाडी यांच्या प्रचार प्रमुखाचे काम करणारे माजी नगरसेवक डॉ. सतीश देसाई सभेची आठवण झाली, की आजही त्या सभेतच असल्याचा भास होतो, असे सांगतात.अटलजी निखळ व उत्तुंग व्यक्तिमत्त्व : सूर्यकांत पाठकग्राहक पेठेच्या एका मजल्यावरील दालनाचे उद्घाटन १९७९ साली अटलींजीनी केले होते. त्यावेळी ग्राहकपेठ ही केवळ रास्त भावाचे विक्री केंद्र न राहता ग्राहक चळवळीचे केंद्र बनले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. ग्राहकपेठेच्या संस्कारक्षम वहीवर अटलजींची कविता व चित्र छापले होते. डॉ. अरविंद लेले यांच्या माध्यमातून त्या वह्या घेऊन पुण्यातील राजभवनावर जाण्याचा योग आला. त्यावेळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अटलजी पुण्यात होते. अटलीजींनी त्यांच्या कवितेतील दोन ओळी स्वाक्षरीसह त्या वहीच्या पहिल्या पानावर लिहून दिल्या. तो अमूल्य ठेवा ग्राहक पेठेने जतन करून ठेवला आहे. याच दरम्यान कारगिलकरिता धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला होता. पुढे राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर तत्कालीन भाजपाचे उत्तमराव पाटील अटलजींकडे घेऊन गेले. त्यांच्या समवेत फोटो काढण्याची इच्छाहोती. ती बोलून दाखविल्यानंतर त्यांनी त्यासाठी स्वत:हूनपुढाकार घेऊन फोटो काढण्याची परवानगी दिली. ते पंतप्रधान झाल्यानंतरदेखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचे वागणेअतिशय साधे व प्रेमळ होते. त्यांच्याविषयी जितके काही ऐकले होते त्याचा अनुभव प्रत्यक्ष घेता आला, याचा मनस्वी आनंद वाटतो.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी जवळून कधी फारसा संबंध आला नाही. मात्र पुण्यातच १९४०-४१ साली त्यांची आणि माझी मोघमच भेट झाली होती. त्यानंतर एका कार्यक्रमानिमित्ताने पुन्हा भेटलो तेव्हा ‘वो बाबाजी पुरंदरे आपही है क्या?’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. तेव्हा ‘हो मीच’ असे त्यांना म्हटले होते तेव्हा ‘ओके फिर मिलेंगे’ असे ते म्हटल्याचे आठवते. बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांनी सावरकरांवर चित्रपट निर्मिती केली होती. तेव्हाही त्या कार्यक्रमाला अटलजी आले असल्याचे स्मरते. अटलजींबद्दल मनात नितांत आदर असून, विवेकी, संयमी नेतृत्त्व, कठोर देशभक्त, भाषेवर उत्तम प्रभुत्व, कवी अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. प्रतिमा आणि बुद्धी असे अनोखे मिश्रण त्यांच्यामध्ये होते.- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेअटलबिहारी वाजपेयी यांचाशिवाजी सावंतांसोबत होता ॠणानुबंधमृत्युंजयकार शिवाजी सावंत आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात विशेष ॠणानुबंध होता. १९९५ साली शिवाजी सावंत यांना ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सावंत यांना दिल्लीला आमंत्रित करून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी वनराईचे अध्यक्ष मोहन धारियादेखील उपस्थित होते. अटलजी सावंत यांना म्हणाले होते की मी तुमच्या कादंबºयांचा अतिशय चाहता आहे. ‘युगंधर’ आणि ‘मृत्युंजय’ या कादंबºया मी वाचल्या आहेत. राजकारण हे कुरूक्षेत्रच असतं तुमचं लेखन मला बळ देत आले आहे, ही आठवण शिवाजी सावंत नेहमी सांगायचे. शिवाजी सावंत गेल्यानंतर अटलजींनी एक शोकसंदेश पाठवला होता. त्याचा ‘आठवणीतले शिवाजी सावंत’ या मी संपादित केलेल्या ग्रंथामध्ये आवर्जून उल्लेख केला आहे. एरवी राजकीय नेत्याचा शोकसंदेश हा काही वाक्यांमध्येच असतो पण अटलजींनी या शोकसंदेशामध्ये शिवाजी सावंत यांचा ‘आधुनिक भारत के श्रेष्ठतम उपन्यासकारों में एक थे’, उनकी लोकप्रियता मराठी भाषा तक सीमित नहीं थी, इसका उदाहरण है ‘मृत्युंजय’ उपन्यास की देश भर में ख्याती’ असा उल्लेख केला असल्याची आठवण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितली.सहृदयी पंतप्रधानपुलाची वाडीमधील एक साध्या वृद्ध कार्यकर्त्या. जनसंघापासून वाजपेयींच्या चाहत्या. कमलाताई फडके असे त्यांचे नाव. भाजपाचे शिवाजीनगर भागातील कार्यकर्ते त्यांना आई म्हणूनच हाक मारत असत. अटलजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. त्यांना पंतप्रधानांच्या खुर्चीत बसलेले पाहायचे असे त्यांच्या मनाने घेतले. कार्यकर्त्यांनीही भेट होणे अवघड आहे, असे त्यांना सांगितले. शिवाजीनगर गावठाणातील कार्यकर्ते अ‍ॅड. सुरेश पायगंडे यांच्याबरोबर त्या दिल्लीला गेल्याच. त्यासाठीचे पैसे त्यांना कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून दिले होते. तिथे खासदार प्रदीप रावत यांना भेटल्या. रावत यांनी त्यांना पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत नेले, पण अधिकारी आत जाऊ द्यायला तयार नव्हते. विनंती केल्यानंतर ‘फक्त लांबून पाहायचे’ असे सांगितले. कमलातार्इंनी ते मान्य केले. पंतप्रधान कार्यालयाचा दरवाजा उघडला व कमलाबार्इंना वाजपेयी खुर्चीवर बसलेले दिसले. दिसल्याबरोबर अत्यानंदाने ‘आता मी मरायला मोकळी झाले’ असे त्या मोठ्याने ओरडल्या. वाजपेयी यांनी मान वर केली तर समोर कमलाबाई. त्यांनी ‘क्या हुआ’ म्हणून विचारणा केल्यावर अधिकाºयांनी त्यांना सर्व काही सांगितले. अटलजींनाही हसू आवरेना. त्यांनी कमलाबार्इंना आत बोलावले. विचारपूस केली. सन्मान केला. माजी उपमहापौर सुरेश नाशिककर आणि शाम सातपुते यांच्या स्मरणात अजूनही हा किस्सा आहे.विज्ञानाबाबत आदर असणारा पंतप्रधानभारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विज्ञानाची आवडच नव्हे तर आदर होता. वाजपेयी यांनी शास्त्रज्ञांना प्रचंड प्रोत्साहन दिले. जय जवान आणि जय किसानच्या बरोबरीने त्यांनी जय विज्ञान आणून विज्ञानाचा दृष्टिकोन देशवासीयांमध्ये रुजवला. मी त्यांना वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून न बघता युगपुरुष म्हणून बघितले. १९९८ साली ११ मे रोजी त्यांच्या नेतृत्वकाळात त्यांनी पोखरणची अणुचाचणी घेण्याचे धैर्य दाखवले. त्याच दिवशी डीआरडीओने एक क्षेपणास्त्र लॉन्च केले. त्याच दिवशी हंसा आकाशयानाचे उड्डाण करण्यात आले. त्यामुळे तो दिवस तंत्रज्ञान दिवस म्हणून वायपेयी यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला आणि काही क्षणात त्यांनी तो मान्यच नाही तर जाहीरही केला. त्यांच्यासोबत दिल्लीत घालवलेली साडेअकरा वर्षे माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ होता.- डॉ. रघुनाथ माशेलकर,ज्येष्ठ शास्त्रज्ञ

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPuneपुणे