शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे यांचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 17:50 IST

संतोष म्हेत्रे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांना ५ एप्रिलला कोरोना संसर्ग झाला होता

पुणे: शहरातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संतोष जनार्दन म्हेत्रे (वय ५५ ) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

संतोष म्हेत्रे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. ड्युटीवर असताना त्यांना ५ एप्रिलला कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, इतर व्याधींमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. पुणे शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणी सुरु झाली असून पोलीस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. अशात सध्या शहर पोलीस दलात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला केवळ ३ ते ४ पोलिसांना लागण होत होती. आता हेच प्रमाण १५ च्या पुढे गेले आहे. सध्या दीडशेहून पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना लागण झाली असून ते उपचार घेत आहेत. आतापर्यंत सतराशेपेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १३ जणांचा मृत्यु झाला आहे. 

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी आता पुन्हा हॉस्पिटलमधील काही बेड राखीव ठेवण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात वेलनेस अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना कोरोनासंबंधी कोणती काळजी घ्यायची याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लसीकरणानंतर आता पोलिसांच्या कुटुंबियांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. -------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसDeathमृत्यू