आश्रमशाळा शिक्षकांच्या पुरस्कारासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:07 IST2020-12-07T04:07:53+5:302020-12-07T04:07:53+5:30

इंदापूर : सामाजिक न्याय विभागाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने आश्रमशाळा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा. तो ...

For Ashram School Teacher Award | आश्रमशाळा शिक्षकांच्या पुरस्कारासाठी

आश्रमशाळा शिक्षकांच्या पुरस्कारासाठी

इंदापूर : सामाजिक न्याय विभागाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने आश्रमशाळा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा. तो मिळावा यासाठी मी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती राज्य आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे राज्याध्यक्ष शेषराव चव्हाण यांनी दिली.

इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर या संस्थेला महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेचे राज्याध्यक्ष शेषराव चव्हाण व संघटनेचे राज्य सल्लागार मानवेंद्र केंद्रे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी चव्हाण बोलत होते. संस्थेचे संस्थापक रत्नाकर मखरे यांनी संस्थेच्या वतीने सन्मान केला.

चव्हाण म्हणाले की,संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांचे काम फार मोठे आहे,त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सत्ताधाऱ्यांच्या,प्रशासनाच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधात फार मोठा संघर्ष उभा करून आपल्या संस्थेला वैभव मिळवलं आहे.हे प्रत्यक्ष पाहून मला मनस्वी आनंद झाला आहे.यापुढे मखरे यांनी मला आणि राज्याच्या संघटनेला मार्गदर्शन करण्याची गरज आहे.असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

Web Title: For Ashram School Teacher Award