Ashok Kharat Case: कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया गोळा केल्याची चर्चा; भोंदूबाबा खरातच्या स्थावर मालमत्तेची माहिती उघड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:39 IST2026-03-26T10:36:11+5:302026-03-26T10:39:49+5:30

Ashok Kharat Case पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून खरात याच्यासह त्यांच्या कुटुंबातील ५ सदस्यांची जमीन, सदनिका, दुकाने आदी स्थावर मालमत्तांची माहिती मागविली आहे

Ashok Kharat Case Talk of collecting crores of rupees in financial gain; Information about Bhondubaba Kharat's real estate assets will be revealed | Ashok Kharat Case: कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया गोळा केल्याची चर्चा; भोंदूबाबा खरातच्या स्थावर मालमत्तेची माहिती उघड होणार

Ashok Kharat Case: कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया गोळा केल्याची चर्चा; भोंदूबाबा खरातच्या स्थावर मालमत्तेची माहिती उघड होणार

पुणे : नाशिक येथील तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांच्या विशेष तपास पथकाने पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून खरात याच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांची जमीन, सदनिका, दुकाने आदी स्थावर मालमत्तांची माहिती मागविली आहे. त्यानुसार नोंदणी विभागाने खरात याच्या राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही माहिती तपास पथकाकडे दिली जाईल, अशी माहिती आहे.

खरात याने कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया गोळा केल्याची चर्चा आहे. खरात याच्यासह त्याच्या कुटुंबीयाच्या अनेक स्थावर मालमत्तांची माहिती विशेष तपास पथकाच्या हाती आली आहे, तसेच खरात याने आणखी कुठे जमीन, सदनिका घेतल्या आहेत का, याची माहिती नोंदणी विभागाकडून मागविण्यात आली आहे. तसे पत्र नोंदणी महानिरीक्षक कार्यालयास आले आहे. त्यानुसार नोंदणी विभागाने खरात याचे कुटुंबीय आणि जवळच्या एका व्यक्तीच्या मालमत्तांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे. खरात याच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत विशेष तपास पथकास दिली जाणार आहे, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

या माहितीच्या आधारे तपास पथकाकडून या मालमत्ता खरेदीसाठी पैसे कोठून आणले, त्यासाठी कोणी मदत केली आहे का, तसेच यातील मालमत्ता बेनामी आहेत का, याचा तपासही पोलिस पथकाकडून करण्यात येणार आहे. या माहितीमुळे खरात याच्या अडचणीत आणखी वाढ होणार असून त्याच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे.

Web Title : अशोक खरात की संपत्ति जांच के दायरे में: कथित धोखेबाज की संपत्ति का खुलासा होगा

Web Summary : पुलिस अशोक खरात नामक स्वयंभू बाबा की वित्तीय अनियमितताओं की जांच कर रही है। महाराष्ट्र में उनके और उनके परिवार की संपत्तियों की जानकारी जुटाई जा रही है। जांच का उद्देश्य इन संपत्तियों के लिए धन के स्रोत और संभावित बेनामी होल्डिंग्स का पता लगाना है, जिससे संपत्तियों की जब्ती हो सकती है।

Web Title : Ashok Kharat's Assets Under Scrutiny: Alleged Fraudster's Wealth to be Revealed

Web Summary : Police are investigating Ashok Kharat, a self-proclaimed godman, for alleged financial irregularities. Authorities are gathering information on his and his family's properties across Maharashtra. The investigation aims to uncover the source of funds for these assets and potential benami holdings, potentially leading to seizure of properties.