दिवाळीत उजळले आशादीप...! अभय भुतडा फाऊंडेशनची मदत, पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:43 IST2025-10-22T13:43:09+5:302025-10-22T13:43:59+5:30
औसा भागात १ कोटी, उदगीर-जळकोटमध्ये ५३ लाख, मुख्यमंत्री सहायता निधीला ५ कोटी, उर्वरित निधी इतर संस्थाना असे एकूण ८ कोटी देण्याचे राष्ट्र कार्य उद्योजक अभय भुतडा यांनी केले

दिवाळीत उजळले आशादीप...! अभय भुतडा फाऊंडेशनची मदत, पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा
पुणे : दिवाळीच्या तोंडावर ओढवलेल्या पूरस्थितीचा शेतकऱ्यांनी हिंमतीने सामना केला. त्याचवेळी सर्वाधिक फटका बसलेल्या काही गावांचा भार उचलत अभय भुतडा फाउंडेशनने पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर मदत पोहचवली. ज्यामुळे सेवाभाव जपण्याचा सकारात्मक संदेश राज्यातील संस्था, उद्योगांसमोर गेला आहे. राज्यात पुराने थैमान घातले. पिकेच काय शेतजमीन खरडून गेली. घरे मोडकळीस आली. काही ठिकाणी माणसे वाहून गेली. अशीच गंभीर स्थिती निर्माण झालेल्या जळकोट, उदगीर, औसा तालुक्यातील काही गावांना प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करण्याचे काम अभय भुतडा फाउंडेशनचे अध्यक्ष अभय भुतडा यांनी केले. जीवित, वित्त हानी आणि पशुधनहानी झालेल्या शेतकरी कुटुंबाच्या थेट खात्यावर शासन निकषानुसार मदत जमा झाली.
१५ ऑक्टोबरला औसा तर १८ रोजी उदगीरमध्ये फाउंडेशनच्या मदत वाटपाचे प्रातिनिधिक कार्यक्रम झाले. जवळपास १३०० कुटुंबांना मदत पोहचली. त्यासाठी औसा येथे आमदार अभिमन्यू पवार, क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तर उदगीर येथे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या पुढाकारातून मदत वाटप कार्यक्रम झाले.
८ कोटींचे पाऊल, आपल्या माणसांसाठी !
औसा भागात १ कोटी, उदगीर-जळकोटमध्ये ५३ लाख, मुख्यमंत्री सहायता निधीला ५ कोटी, उर्वरित निधी इतर संस्थाना असे एकूण ८ कोटी देण्याचे राष्ट्र कार्य उद्योजक अभय भुतडा यांनी केले. शासनाची मदत सार्वत्रिक आहे. मात्र त्या त्या भागात अभय भुतडा फाउंडेशन सारख्या दानशुर संस्थांनी पुढे यावे. जसे मूळचे लातूरकर असलेले उद्योजक अभय भुतडा यांनी आपल्या भागासाठी, आपल्या माणसांसाठी ८ कोटींचे पाऊल टाकले. - ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, पंढरपूर
फाउंडेशनने दिला आधार...
पुरात होत्याचे नव्हते झाले. पीक गेले, जमीन गेली, गुरंढोरं गेली. घरचा कर्ता गेला. पाण्याबरोबर आमचे आयुष्यही वाहून गेले. डोळ्यातील अश्रू थांबत नसले तरी पुढच्या पिढीच्या उज्जवल भविष्याची आशा आहे. त्यांच्या शिक्षणाला, जगण्याला अभय भुतडा फाउंडेशनचा आधार मिळाला. मदत खात्यावर जमा झाली.- सुनील बिरादार, आपत्तीग्रस्त शेतकरी, धडकनाळ