शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

अवघ्या ९ महिन्यांत तब्बल १३ कोटींचे ड्रग्ज जप्त; तरुणाईला विळखा; पुण्यासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 12:33 IST

रात्रभर पबमध्ये नशेत झिंगणाऱ्यांचे एक वेगळेच विश्व पुण्यात रात्री पाहायला मिळत असल्याने ही नक्कीच धोक्याची घंटा समजली जातीये

नम्रता फडणीस 

पुणे : ललित पाटील ड्रग्ज रॅकेट, पोर्शे कार अपघात अशा प्रकरणांमुळे पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा हा खेळ सर्वांसमोर आला आहे. पुण्यातील तरुणाई आज अंमली पदार्थ आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे भीषण वास्तव आहे. रात्रभर पबमध्ये नशेत झिंगणाऱ्यांचे एक वेगळेच विश्व पुण्यात रात्री पाहायला मिळत असल्याने ही नक्कीच धोक्याची घंटा समजली जात आहे ! शहरात गेल्या वर्षी अवघ्या नऊ महिन्यांत विक्रमी १३ कोटींचे अमली पदार्थ गुन्हे शाखेने जप्त केले असून, ही देशातील सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.

ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिसांनीपुणे, कुरकुंभ, दिल्ली, सांगलीत छापे टाकून तब्बल साडेतीन हजार कोटींचे १७०० किलो रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. आता फर्ग्युसन रस्त्यावरील एल-३ पबमध्ये तरुणाई अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळल्याने पुण्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. अंमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, ड्रग्ज वितरणाची साखळी तोडण्यात पोलीस काही पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढत आहे. पूर्वी अफीम, कोकेन, गांजा, चरस याच्या आहारी जाणाऱ्या तरुणांमध्ये आता नशेचा ट्रेंडदेखील बदलला आहे. आता कोकेन, मेफेड्रोन (एम.डी), एलएसडी स्टॅम्प, एमडीएमए, मशरूम आणि हशिश तेल याचा वापर नशेसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या कारवायांवरून समोर येत आहे. पोलिसांनी गेल्या वर्षी सव्वाकोटी रुपयांचे एलएसडी स्टॅम्प जप्त केले होते. ही स्टॅम्पची नशा करण्यात नामांकित महाविद्यालयीन तरुण होते. त्यामुळे पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये ७ कोटी १४ लाख २४ हजार रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. त्या तुलनेत गेल्या वर्षी अवघ्या नऊ महिन्यात पुणे पोलिसांना १३ कोटींचा विक्रमी अमली पदार्थ व मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले.

पोलिसांची कारवाई का थंडावते?

ललित पाटील ड्रग्ज रॅकेटनंतर पोलिसांनी ड्रग्जचा साठा उत्पादन त्याची साखळी तोडण्याची मोहीम हाती घेतली. आता पोर्शे कार अपघातानंतर पोलिसांनी अनधिकृत पबची यादी महापालिका प्रशासनाला कळविली. त्यापैकी काही पबवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र महिन्यानंतर पुन्हा महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई थंड झाली. या कारवाया अधूनमधून थंड का होतात? असा सवाल पुणेकर विचारू लागले आहेत. 

कोडवर्डने ऑनलाइनही मिळते ड्रग्ज

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार वाढले असल्याने अंमली पदार्थाची विक्रीदेखील सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. याशिवाय सोशल मीडियावर विशिष्ट कोडवर्डचा वापरही केला जात आहे. डिजिटल माध्यमावरही करडी नजर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन आणि डिलिव्हरीचे स्केटही धसास लावले जात असल्याचे पोलिस सांगत आहेत. असे असतानाही तरुणाईला अंमली पदार्थ सहजपणे कसे उपलब्ध होतात? याबाबत पोलिसांकडे कोणतेच उत्तर नाही.

यंदाही ७१ आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

गतवर्षी १३५ दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जवळपास १८३ आरोपींना कारागृहाची हवा दाखविली आहे. यंदा मेअखेर ४६ गुन्ह्यात ७१ आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.शहरात सर्वाधिक मेफेड्रोनची कारवाई

शहरात सर्वाधिक तीन कोटींपेक्षा अधिक किमतीच्या मेफेड्रोनची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अफिम व कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे.

पुण्यातील महत्त्वाच्या घटना२०२२शहर पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील २१ पोलिस ठाण्यातील जप्त केलेले ४ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपयांचे अमली पदार्थ रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीमध्ये नष्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गांजा, एमडी, कोकेन, चरस, पॉपीस्टी आणि हेरॉईनचा समावेश होता.

२०२३ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ किलो ७५ ग्रॅमचे तब्बल दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. ड्रग माफिया ललित पाटील याच्यामुळे पोलिसांचे छापासत्र सुरू झाले.

२०२४सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये ३०० कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली, परिसरातही छापे टाकून साडेतीन हजार कोटी रुपयांचे १७०० किलो रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. पुण्याजवळील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मेफेड्रोन तयार करण्यात आले. ते थेट दिल्लीतून कुरिअरद्वारे लंडनला पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर देशपातळीवरील तपास यंत्रणांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली.

पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात केलेली कारवाई (एनडीपीएस ॲक्टनुसार दाखल गुन्हे)वर्ष -             जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत (रुपयांत)

२०१९                         ३ कोटी ८१ हजार ७९७२०२०                         १ कोटी ९५ लाख ०८ हजार ६१६२०२१                         २ कोटी ५८ लाख २९ हजार२०२२                         ७ कोटी १४ लाख २४ हजार२०२३                         १३ कोटी ६१ लाख२०२४ (मेअखेर) ३५०० कोटी १८ लाख ८६ हजार

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाExcise Departmentउत्पादन शुल्क विभागMONEYपैसाStudentविद्यार्थीHealthआरोग्य