शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पोटगी न देणाऱ्या पतीविरुद्ध अटक वॉरंट

By admin | Updated: April 14, 2015 01:40 IST

कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त होऊन घटस्फोट घेतल्यानंतर न्यायालयाने एका महिलेला दरमहा ३ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.

पुणे : कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त होऊन घटस्फोट घेतल्यानंतर न्यायालयाने एका महिलेला दरमहा ३ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून पतीने पोटगीची रक्कमच दिली नाही. त्यामुळे दोन मुलांना पदरात घेऊन जगणाऱ्या महिलेसाठी न्यायालयाने जप्ती वॉरंट काढले. हडपसर येथील हिंगणेमळा येथे राहणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये न्यायालयात पोटगीसाठी दाद मागितली होती. दोन्ही मुले पत्नीकडेच असतात. कौटुंबिक हिंसाचार सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिला दरमहा ३ हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिला होता. मात्र, पतीने न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. १२ आॅगस्ट २०१३ पासून ते १२ जानेवारी २०१५ या कालावधीची तब्बल ५१ हजार रुपये पोटगीची रक्कम झाली. दरम्यान, पती व पोलिसांनी संगनमत करून या कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याने पोलिसांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही वसुली न झाल्याने पतीला अटक करण्याचे वॉरंट काढण्याचा अर्ज अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. चेतन भुतडा यांनी केला. न्यायालयाने अर्ज मंजूर केला आहे. $$्निपोटगीची रक्कम वसूल करा : न्यायालय४पत्नी अशिक्षित असल्याने उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे पोटगी वसूल करण्याचा अर्ज पत्नीने न्यायालयात केला. न्यायालयाने पतीची जंगम मालमत्ता जप्त करून १३ फेब्रुवारीपर्यंत ५१ हजार रुपये मिळवावेत किंवा त्याच्या मालमत्तेची विक्री करून रक्कम वसूल करण्यासंबंधीचा वॉरंट जारी केला. या वॉरंटची अंमलबजावणी करण्यास हडपसर पोलिसांना सांगितले आहे.