शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला अटक; चोरीच्या कारमधून आले होते सराईत चोरटे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 3:51 PM

उरुळी कांचन येथील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या होते तयारीत चोरटे...

पुणे : उरुळी कांचन येथील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या चौघा जणांच्या टोळीला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. 

गणेश राजेंद्र शिवडकर (वय २१, रा. आनंदनगर, रामटेकडी), सुनिल प्रकाश गायकवाड (वय २३, रा. रामटेकडी) तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय १९, र. आनंदनगर, रामटेकडी), निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय २४, रा. महम्मदवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार  किशोर प्रकाश गायकवाड (रा. मंगळवार पेठ) आणि आकाश गणपत माने (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, कटावणी, कटर, चाकू, कात्री, कात्रीची पाती, मिरची पुड अशी दरोडा टाकण्याची हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. 

याप्रकरणी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील हवालदार उदय सुदाम काळभोर यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १० मे रोजी रात्री उरुळी कांचन परिसरात गस्त घालत असताना डाळींब गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील कॅनॉलच्या कडेला एका कारमध्ये ६ जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केल्यावर त्यातील दोघे जण पळून गेले. पोलिसांनी चौघांना पकडून त्यांच्याकडील हत्यारे जप्त केली आहेत. अधिक चौकशी केली असता महामार्गावरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या हेतूने ते चारचाकी मोटारीतून जात होते. त्यांच्याकडील कार चोरीची असल्याचे उघड झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकPetrol Pumpपेट्रोल पंपRobberyचोरी