शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल दुरुस्तीची घोषणा विरली हवेत

By admin | Updated: March 11, 2017 03:11 IST

महावितरणच्या वीजबिलासंदर्भातील कारभारासंदर्भात कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे वीज वितरण शाखा कार्यालयात दर गुरुवारी वीजबिल दुरुस्तीची सुविधा तातडीने

कोरेगाव भीमा : महावितरणच्या वीजबिलासंदर्भातील कारभारासंदर्भात कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे वीज वितरण शाखा कार्यालयात दर गुरुवारी वीजबिल दुरुस्तीची सुविधा तातडीने सुरु करण्याची घोषणा झाली. मात्र दीड वर्षानंतरही अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने ग्राहकांना शिक्रापूरलाच चकरा माराव्या लागत आहेत. वीजबिलही ग्राहकांना वेळेवर न मिळाल्याने व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे ग्राहक पंचायतीचे भानुदास सरडे यांनी सांगितले.कोरेगाव भीमा वीज वितरण शाखा कार्यालयांतर्गत कोरेगाव भीमा, सणसवाडी व इतर पाच गावांचा समावेश होतो. यामध्ये ७ हजारापेक्षा जास्त घरगुती, ५०० पेक्षा जास्त औद्योगिक कारखाने व २ हजारापेक्षा जास्त शेतीपंप आहेत. वीजबिल नागरिकांना मुदत संपूनही मिळत नसल्याने व्याजाचाही भुर्दंड सोसावा लागत आहे. नागरिकांना अनेकदा चुकीची वीजबिले येत असल्याने ती दुरुस्तीसाठी शिक्रापूर येथील कार्यालयातच जावे लागत आहे.याबाबत ३० सप्टेंबर २०१५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर शिक्रापूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आर. बी गोरे यांनी दर गुरुवारी कोरेगाव भीमा शाखा कार्यालयात वीजबिल दुरुस्तीचा कर्मचारी येऊन ग्राहकांना जागेवरच वीजबिल दुरुस्ती करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र दीड वर्षानंतरही कोरेगाव भीमा कार्यालयात वीजबिल दुरुस्ती केंद्र सुरु न झाल्याने ग्राहकांना नाहक मन:स्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे ग्राहक पंचायतीचे भानुदास सरडे यांनी सांगितले.याबाबत शिक्रापूरचे उपकार्यकारी अभियंता आर. बी. गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वीजबिल दुरुस्ती केंद्र सुरू केले होते. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्याने वीजबिल दुरुस्ती केंद्र बंद केले असून, पुढील गुरुवारपासून केंद्र पुन्हा कोरेगाव भीमा कार्यालयात सुरू करणार असल्याचे सांगितले.दुरुस्ती केंद्र सुरू केलेच नाही...महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गोरे यांनी वीजबिल दुरुस्ती केंद्र सुरू केले असल्याचे सांगितले आहे, मात्र किती ग्राहकांची वीजबिले दुरुस्ती केली व ग्राहकांच्या किती तक्रारींचे निराकरण केले आहे हे आम्हाला तरी समजू द्या, असा संतप्त सवाल सरडे यांनी केला.