शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:08 IST

अजित पवारांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे

पुणे : पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी दमानिया यांनी मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मेघदूत बंगल्यावर दमानिया व बावनकुळे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत असा इशारा दिला आहे. मी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा बाहेर काढणार आहे. अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मला योग्य वाटेल ते मी करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा रस्ता दत्तक घेण्याच्या योजनेचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.  पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारासंबंधी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीला याचा अभ्यास करू द्या, काय अहवाल येतो, त्याबद्दल निर्णय वरिष्ठ घेतील, तोपर्यंत मी कोणतेही भाष्य करणार नाही. 

केंद्र सरकार ही गोष्ट गांभीर्याने घेईल

शेतकऱ्यांसाठी आम्ही ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते, नंतर पुन्हा पाऊस पडला त्यामुळे त्यामध्ये ८ हजार कोटी रुपये वाढवून ते पॅकेज ४० हजार कोटी रुपये केले आहे. पत्रकारांनी अल्पवयीन गुन्हेगारीविषयी प्रश्न उपस्थित केला, त्यावर ते म्हणाले की, पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीविषयी विशेषतः अल्पवयीन मुले गुन्हेगारीत येत आहेत, १४ ते १५ वर्षांखालील मुले गुन्हे करत आहेत, अल्पवयीन मुलाचे वय १८ वर्ष आहे, ते काढून कमी करावे हे केंद्र सरकारच्या देखील लक्षात आणून देत आहोत, काही चुकीचे लोक त्यांचा हेतू साधण्याकरिता अल्पवयीन मुलाला सामावून घेत आहेत, कारण ते अल्पवयीन असल्यामुळे गुन्हा दाखल करायला अडचणी होतात. केंद्र सरकार ही गोष्ट गांभीर्याने घेईल, असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Damania Demands Resignation; Ajit Pawar Reacts, 'I'll Do What's Right'

Web Summary : Anjali Damania seeks Ajit Pawar's resignation over alleged scams, threatening legal action after meeting with Minister Bawankule. Pawar responds he'll act according to his conscience. He addressed concerns about land deals and juvenile crime, urging the central government to lower the age for criminal responsibility.
टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारanjali damaniaअंजली दमानियाMahayutiमहायुतीNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहparth pawarपार्थ पवार