शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

बेल्हा बाजारात जनावरांची आवक रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

बेल्हा : येथील संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणारा आठवडे बैलबाजारात बैलांची आवक दिवसेंदिवस घटत आहे. व्यापारांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने आवक ...

बेल्हा :

येथील संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणारा आठवडे बैलबाजारात बैलांची आवक दिवसेंदिवस घटत आहे. व्यापारांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने आवक घटली. तसेच जनावरांना मागणी कमी असल्याने उठावही मिळाला नाही.

पुणे जिल्ह्यात बेल्हा येथील आठवडे बैलबाजार प्रसिद्ध आहे. या बैलबाजारात शेतकरी व व्यापारी बैल खरेदी व विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. या बाजाराबरोबरच म्हशींचाही मोठा बाजार भरतो. तसेच कडधान्य बाजार व तरकारी बाजारही मोठा भरतो. बीड, कल्याण, पंढरपूर, संगमनेर, आष्टी, लासलगाव, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून व्यापारी व शेतकरी बैल खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाजारातील बैलांची आवक तसेच खरेदी-विक्रीत घट झाली. सोमवारी भरलेल्या बाजारात बैलाची आवक तुलनेने कमीच झालेली होती. तसेच खरेदी अगदी कमीच झाली. बैलांचे भावही कमी असले तरी खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या काही महिन्यांपासून या बाजारात बैलांची आवकही कमीच होत आहे. बैलांना भावही मिळत नाहीत. तसेच मालाला उठावही होत नसल्याचे अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले. बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासूनच या बाजारावर परिणाम झाला आहे. तसेच कोराेनाकाळातही बाजार तीन महिने बंद होता.

चौकट

आजच्या बाजारात खिल्लारी बैलजोडीचे भाव ५० ते ६० हजार रुपये, तर गावठी बैलजोडीचे भाव ४० ते ५० हजार रुपये होते. शेतकरीवर्ग आधुनिकीकरणाकडे वळला असून, शेतकरी वर्ग ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच शेती करण्याकडे वळला असून शेतकरीवर्ग बैलबाजारात येत नाहीत. साखर कारखाने चालू झाले आहेत. तरीही बैलबाजारात खरेदीसाठी गर्दी नाही.

फोटो : बेल्हा येथील बाजारात जनावरांची झालेली आवक.