शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त प्रवाशांची रेल्वेवर दगडफेक

By admin | Updated: September 23, 2015 03:37 IST

केडगावला थांबणारी हैदराबाद -मुंबई एक्सप्रेस आणि बारामती -पुणे -कर्जत शटल या दोन्ही सकाळच्या गाड्या उशिराने धावत असल्याने अन्य एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा

केडगाव : केडगावला थांबणारी हैदराबाद -मुंबई एक्सप्रेस आणि बारामती -पुणे -कर्जत शटल या दोन्ही सकाळच्या गाड्या उशिराने धावत असल्याने अन्य एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा, या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले़ त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सुवर्ण जंयती एक्सप्रेसवर दगडफेक केली़ ही घटना मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली़ एक्सप्रेस रेल्वेगाड्या रेल्वेस्थानकावर काही मिनिटांसाठी तरी थांबवाव्या ही प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. आज या मागणीचा उद्रेक झाला.सकाळी हैदराबादवरून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस सुमारे ४ तास उशिरा होती. त्यामुळे दुसऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना २ मिनिटांचा थांबा द्यावा, अशी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे विनंती केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत अधिकाऱ्यांनी आझाद हिंद एक्स्प्रेसला थांबा दिला नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी धुडकावून लावली व सिग्नल दिल्याने रेल्वे केडगाव स्थानकावरून सुसाट निघून गेली. त्यानंतर १५ मिनिटांनी स्थानकातून ‘सुवर्णजयंती एक्स्प्रेस’ जात असल्याचे प्रवाशांना समजले. त्यानंतर प्रवासी पुन्हा रेल्वेस्थानकातील अधिकाऱ्यांपाशी जमा झाले. या एक्स्प्रेसला तरी २ मिनिटांचा थांबा द्यावा, अशी मागणी पुन्हा त्यांनी केली. महिला प्रवासी व रेल्वेस्थानकातील कर्मचारी, अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतरही एक्स्प्रेस रेल्वेला थांबा न देण्याच्या निर्णयावर प्रशासन ठाम होते. ही एक्स्प्रेस गाडी जाण्यासाठी ही प्रशासनाने हिरवा सिग्नल दिला. त्यानंतर मात्र, प्रवाशी संतप्त झाले. सुमारे २00 प्रवासी रेल्वेच्या ट्रॅकवर उतरले. रेल्वे रुळाच्या मधोमध उभे राहिले. २ जणांनी रेल्वे थांबावी म्हणून रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे ट्रॅकवर लाल फडके काठीच्या साहाय्याने उभे केले. तरीही रेल्वेच्या ड्रायव्हरने एक्स्पे्रस हळू केली, पण सिग्नल न मिळाल्याने थांबण्याच्या मन:स्थितीत तो नव्हता. त्यानंतर २ संतप्त अनोळखी प्रवाशांनी दगड इंजिनच्या दिशेने भिरकावले. यामध्ये इंजिनसमोरील काच फुटल्याचे समजले. त्यानंतर रेल्वे रुळावर थांबली. संतप्त प्रवासी अवघ्या काही सेकंदांत रेल्वेत बसून पुण्याकडे रवाना झाले. दगडफेकीवेळी मात्र रेल्वे प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. दररोज पुण्याकडे जाणाऱ्या सोलापूर व मनमाड पॅसेंजर उशिरा येतात. त्यामुळे पुण्याकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशाचा आज उद्रेक झाला. (वार्ताहर)