शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांमध्ये लसीकरणाला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मोठ्या सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी पुणेकर नागरिकांनी केली आहे. लसीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मोठ्या सोसायट्यांना दवाखान्यांच्या निगराणीखाली लसीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी पुणेकर नागरिकांनी केली आहे. लसीकरण हा सर्वसामान्यांचा हक्क आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये लसीकरण झाल्यास त्याचा फायदा होवू शकेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपणही याबाबत विचारणा केली असता राज्य सरकारने आपल्याला परवानगी नसल्याचे सांगितल्याचे म्हणले आहे. काही अडचण निर्माण झाल्यास उपचारांची सुविधा असावी असे सांगत लसीकरण केंद्र रुग्णालयांमध्येच असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त पुणेकरांचे लसीकरण व्हावे यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र यानंतरही केंद्रावर जाण्याची भिती आणि लसीबद्दल गैरसमज यामुळे लोक लसीकरण करणे टाळत आहेत. या पार्श्वभुमीवर काही रुग्णालयांचे प्रतिनिधी हे सोसायट्यांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देत आहेत. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाची अशी सोय उपलब्ध करुन देण्याची जावी मागणी नागरिक करत आहेत.

याविषयी बोलताना पुण्यातले नागरिक रविंद्र सिन्हा म्हणाले, “पुण्यात रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहून अशी विनंती करत आहोत की पुण्यात सरसकट लसीकरणाला परवानगी द्यावी. दरम्यान पुण्यात ‌अनेक ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर जायला त्रास होते आहे. त्यातच रुग्णालये सोय करुन द्यायला इच्छुक आहेत. त्यामुळे वैद्यकीय निगराणी मध्ये लसीकरण करण्यास तसेच अशी केंद्रे सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे.”

चौकट

महापालिकेने मात्र अशी परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, “आम्ही देखील याबाबत विचारणा केली होती. मात्र लसीकरणानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास अडचण येवू शकते. हे लक्षात घेवूनच सरकारी प्रॅाटोकॅाल ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयातच लसीकरण करणे आवश्यक आहे.”