शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरला नगराध्यक्षपदासाठी युती

By admin | Updated: May 11, 2015 06:00 IST

राजगुरुनगर नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष करण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याची माहिती मावळचे आमदार बाळाभेगडे यांनी दिली.

दावडी : राजगुरुनगर नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष करण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याची माहिती मावळचे आमदार बाळाभेगडे यांनी आज (दि.१0) पत्रकार परिषदेत दिली.राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी येत्या १६ तारखेला निवडणूक होणार असून, यासाठी नगरपरिषदेवर भाजपा-सेनेची सत्ता आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरूआहेत. या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी आज येथील विश्रामग्रहात भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाबाबत भाजपा नेत्यांची वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीमधील भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेसाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शा. ल. घुमटकर, भाजपाचे युवानेते अतुल देशमुख, शहर प्रमुख विष्णू बोऱ्हाडे, मंगेश गुंडाळ यांच्यासह भाजपाच्या बाजूने असलेल्या अपक्ष नगरसेविका सुरेखा क्षोत्रिय यांच्यासह नगरसेवक शिवाजी मांदळे, नंदा जाधव, मनोहर सांडभोर, संपदा सांडभोर, संगीता गायकवाड, स्नेहलता गुंडाळ, अर्चना घुमटकर उपस्थित होते.भेगडे यांनी सांगितले, की भाजपाने प्रथमच राजगुरुनगर परिषद स्वबळावर लढविली आहे. त्यात पक्षाला मोठे यश मिळाले. बहुमत मिळण्यासाठी १0 जागांवरसत्ता येणे अपेक्षित होते; मात्र तसे घडले नाही. तरीही नगर परिषदेत सात जागा मिळवत यश मिळविले. या नगर परिषदेत भाजपा ७, शिवसेना २ तर अपक्ष ९ असे बलाबल आहे. जरी निवडणुकीमध्ये सेना-भाजपा युती झाली नसली तरी नगराध्यक्ष निवडीसाठी सेना-भाजपाची युती होणार आहे.याबाबत नुकतीच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ आदी नेत्यांबरोबर राजगुरुनगर नगर परिषदेवर भाजपा-सेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा झाली आहे. यामध्ये नगराध्यक्ष भाजपाचा तर उपनगराध्यक्ष शिवसेनेचा असा निर्णय झाला आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाचा निर्णय १५ तारखेला अंतिम घेतला जाणार आहे. (वार्ताहर)