शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

खेडच्या महिला तहसीलदारांच्या पतीवर केलेले आरोप जनतेची दिशाभूल करणारे;राष्ट्रवादी-शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 15:46 IST

स्वतःच्या मताचे अधिकारी आणण्याचा आमदारांचा डाव असून महाविकास आघाडी सरकार असल्याने हाणून पाडला जाईल..

ठळक मुद्देतहसीलदार सुचित्रा आमले यांनी कोरोना कालावधीत अतिशय केले उत्तम प्रकारे काम

राजगुरुनगर: आमदार दिलीप मोहीते पाटील यांनी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या विरोधात केलेली तक्रार चुकीची व जनतेची दिशाभूल करणारी आहे असा आरोप माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला आहे. ते आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत बोलत होते. 

        तहसीलदार सुचित्रा आमले यांनी कोरोना कालावधीत अतिशय उत्तम प्रकारे काम केले असून रूग्ण संख्या तालुक्यात अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. ऑक्टोबर २०१८ पासून खेडच्या तहसीलदार म्हणून त्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. बदलीचा विषय हा प्रशासनाचा असून अधिकारी ऐकत नसतील तर अशा पद्धतीने आरोप करून स्वतःच्या मताचे अधिकारी आणण्याचा डाव आमदार मोहिते यांचा असून तो महाविकास आघाडी सरकार असल्याने हाणून पाडला जाईल असे गोरे यांनी सांगितले. 

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तक्रारीत बाळासाहेब आमले यांचा प्रत्यक्ष संबंध आला नसून अप्रत्यक्ष धमकी दिल्याचे म्हटले आहे. माजी आमदार सुरेश गोरे यांनी आमदार दिलीपराव मोहीते यांना धमकी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित केला आहे. धमकी कोण कोणाला देते हे पाहणे गरजचे आहे. विद्यमान आमदारांना स्वतःच्या मर्जीतील अधिकारी हवे असल्याने तहसीलदार सुचित्रा आमले यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगले योगदान दिले असुनही व त्यांचा नियमानुसार कार्यकाळ बाकी असूनही पोलीस स्टेशनला त्यांच्या पतीविरोधात तक्रार देऊन वेगळे वळण दिले आहे. माजी आमदार सुरेश गोरे यांनी आमदार दिलीपराव मोहिते व तहसीलदार सुचित्रा आमले यांच्यातील संघर्षात उडी घेत तहसीलदारांच्या कार्याचे कौतुक केल्याने पुढे काय होणार याचे खेड तालुक्यातील जनतेत औत्सुक्य आहे.

टॅग्स :KhedखेडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस