शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व तलाठी दप्तर ऑनलाईन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : ऑनलाईन सातबार, ई-फेरफार आणि ऑनलाईन आठ ‘अ’ उपलब्ध करून देण्याचा प्रयोग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर- शिंदे

पुणे : ऑनलाईन सातबार, ई-फेरफार आणि ऑनलाईन आठ ‘अ’ उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्‍वी झाल्यानंतर शासनाने आता संपूर्ण तलाठी दप्तरच ऑनलाईन करण्याचा अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. या अंतर्गत तलाठ्याकडे येणारे सर्व १ ते २१ नमुन्यांची सुविधा ऑनलाईन करणार आहेत.

महसूल विभागात सर्वात महत्वाचा दुवा व थेट लोकांशी संपर्क असलेला घटक म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते.

तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या २१ नमुन्यांची माहिती ठेवलेले असतात. यामध्ये गाव नमुना क्रमांक एक ते २१ असतात. त्यापैकी सातबारा, आठ ‘अ’ आणि फेरफार उतारे यांचा संबंध हा नागरिकांशी येत असतो. सातबारापैकी सात क्रमांकाचा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा असतो, तर बारा नंबरचा उतारा हा पिकांसंबंधीचाअसतो. गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, कब्जेदाराचे नाव, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्रफळ, हक्क आदी तपशील दिलेला असतो. नमुना बारामध्ये पिकाखालील क्षेत्रफळाची माहिती दिलेली असते. ८ ‘अ’ या उताऱ्यामध्ये एका व्यक्तीच्या असलेल्या गटांची माहिती असते. जमिनीच्या खरेदी विक्री झाल्यानंतर त्याप्रमाणे फेरफार उताऱ्यामध्ये नोंदी केल्या जात असतात. ही सर्व माहिती आजवर हस्तलिखित असल्याने त्यामध्ये असंख्य मानवी चुका झाल्या होत्या. तसेच साधी शेतसा-याची नोंद करण्यासाठी देखील लोकांना तलाठी ऑफीसमध्ये हेलपाटे मारावे लागतात. यासाठी अनेक वेळा शंभर रुपयाच्या कामासाठी दोनशे रुपये खर्च करावा लागतो. यामुळेच तलाठी दप्तर ऑनलाईन झाल्यानंतर अनेक लहान मोठी कामे घर बसल्या करणे शक्य होणार आहे.

---

प्रचंड मोठे काम

संपूर्ण राज्यातील तलाठी दप्तर ऑनलाईन करणे प्रचंड मोठे काम आहे. सध्या ऑनलाईन सातबार, ई-फेरफार आणि ऑनलाईन आठ ‘अ’ उपलब्ध करून देण्याचा प्रयोग यशस्‍वी झाला आहे. यामुळेच पुढचे पाऊल म्हणून संपूर्ण तलाठी दप्तर ऑनलाईन करण्याचा निर्णय महसुल विभागाने घेतला आहे. यामुळे लोकांना अनेक सुविधा घर बसल्या मिळणार असून, तलाठ्यांची कामे देखील सोपी होणार आहेत. पैशाचा हिशोब ऑनलाईन होईल, खातेदारांची मागणी ताळमेळ सोपा होईल.

- रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-सातबारा प्रकल्प