शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्यासाठी आळंदी नगरपालिका सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:25 IST

आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत.

ठळक मुद्देडेंगीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत११ नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात, १४ नोव्हेंबरला एकादशी तर १६ नोव्हेंबरला संजीवन सोहळा

आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री  ज्ञानोबारायांच्या ७२१व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत.  सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंगीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना तसेच यात्रेला आलेल्या भाविकांना याचा फटका बसू नये यासाठी आळंदी नगर परिषदेकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. ११ नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रेला सुरुवात होणार असून, १४ नोव्हेंबरला एकादशी तर १६ नोव्हेंबरला माऊलींचा संजीवन सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी अलंकापुरीत देवस्थान व नगर परिषदेकडून कार्तिकीची जय्यत तयारी केली जाणार आहे. 
सोहळ्यापूर्वी आळंदी शहराच्या संपूर्ण परिसरात जेटिंग मशीनद्वारे औषधांची फवारणीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. शहरातील बंद व खुल्या गटारांमध्ये मशीनच्या मार्फत औषधांची मात्रा फवारण्यात आली आहे. त्यातील जीवजंतू नष्ट करण्यात आले आहेत. तुंबलेली गटारे उपसणे, कचराकुंड्या रिकाम्या करणे, कचर्‍याची विल्हेवाट लावणे, ठिकठिकाणी डिसीन फेक्टो, कार्बोलिक पावडर फवारण्याची कामे सुरु आहेत. शहरातील मुख्य ठिकाणी वाढलेले गवत कामगारांच्या साह्याने काढले जाणार आहे. कार्तिकी सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासून भाविकांचे आरोग्य रोगमुक्त ठेवण्यासाठी चार टप्प्यांत प्राधान्य देऊन काम केले जाणार आहे.     
कार्तिकी सोहळ्याला अलंकापुरीत लाखो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे गर्दी होऊन शहरातील प्रमुख रस्ते मोठ्या स्वरूपात अस्वच्छ होत असतात. अस्वच्छ परिसरामुळे भाविकांना प्रदक्षिणा घालताना तोंडाला रुमाल लावण्याची वेळ येते. भाविकांच्या या समस्यांचा विचार करून परिसर व शहर कचरामुक्त तसेच स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने आता कंबर कसली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य