कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरातील आरोग्य विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:46 AM2017-10-30T11:46:20+5:302017-10-30T11:48:44+5:30

कार्तिकी शुद्ध एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ५ ते ६ लाख भाविक पंढरपूर नगरीत येणार असे गृहीत धरुन येणाºया भाविकांना आरोग्याबाबत सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

Prepare Pandharpur Health Department for Kartika Yatra | कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरातील आरोग्य विभाग सज्ज

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरातील आरोग्य विभाग सज्ज

Next
ठळक मुद्देमोकाट जनावरांचा बंदोबस्त अन्न पदार्थांवर नियंत्रणआरोग्य प्रयोगशाळेचे अधिकारी कार्यरत असणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि ३० : कार्तिकी शुद्ध एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी ५ ते ६ लाख भाविक पंढरपूर नगरीत येणार असे गृहीत धरुन येणाºया भाविकांना आरोग्याबाबत सुविधा पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
२९ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकी यात्रेनिमित्त शहरात गर्दी राहणार आहे. या कालावधीत शहरात स्वच्छता राहावी. शहरातील नागरिकांचे व भाविकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्याचे काम होत आहे.
यात्रा काळात शहरवासीयांना व यात्रेकरुंना शुद्ध व निर्जंतुक पाणीपुरवठा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा केंद्राकडून करण्यात येतो. तसेच शहरातील विहिरी व कूपनलिकांचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. या पिण्याच्या पाण्याची नगरपालिका व जिल्हा परिषदेचे आरोग्य निरीक्षक दररोज क्लोरीन टेस्ट पाहतात. या यात्रा कालावधीमध्ये सोलापूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे अधिकारी कार्यरत असणार आहेत.
शहरातील सर्व पटांगणे, नदी परिसर रोजच्या रोज स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी हंगामी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज शहरात ५ टक्के मॅलेथॉन पावडर,  ब्लिचिंग पावडर तसेच फिनाईलचा वापर करण्यात येतो. नदीच्या घाटावर व पटांगण परिसरात प्रात:र्विधीसाठी तात्पुरते संडास तयार करण्यात येतात. तसेच ५ फिरती शौचालये वापरण्यात येतात. ते निर्जंतुक करण्यात येतात. शहरातील कचरा दररोज साफ करण्यासाठी नगरपालिकेची ८ वाहने व शासनाचे ८ टिपर रिक्विझीशनद्वारे मिळतात. अशी १६ वाहने व तीन कंटेनर कॅरिअर व १२५ कॅरिअरद्वारे शहरातील कचरा उचलण्याचे काम करण्यात येणार आहे व कुंडावर त्वरित ५ टक्के मॅलेथॉन पावडर फवारण्यात येते व प्रोपॉक्सर फवारुन घरमाश्यांचा नायनाट करण्यात येत आहे. तसेच चार ब्लोअर मशीनने नदीचे वाळवंट, ६५ एकर, पत्राशेड, मोकळी पटांगणे व रस्त्याच्या बाजूने बायो कल्चर फवारण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितली. 
---------------------
अन्न पदार्थांवर नियंत्रण
शहरातील कच्ची, नासकी फळे यांचा नाश करण्यात येणार आहे. यासाठी सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयास योग्य त्या उपाययोजना व कार्यवाहीबाबत पत्र देण्यात आले असल्याची माहिती डॉ. संग्राम गायकवाड यांनी दिली.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त 
शहरात मोकाट जनावरे सोडू नयेत असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यात्रा कालावधीपूर्वी शहरातील इतर मोकाट जनावरे पकडून शहराबाहेर सोडण्यात येणार आहेत.

Web Title: Prepare Pandharpur Health Department for Kartika Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.