अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:23 IST2025-06-01T19:22:41+5:302025-06-01T19:23:20+5:30

अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण आज मी बारामतीत आलो आहे, मला रोखून दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले.

Ajit Pawar is not providing funds for social justice schemes; Laxman Haake direct allegation | अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप

अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप

बारामतीअजित पवार कोणत्याही पक्षाची सत्ता आली की, त्या सरकारमध्ये सामील होतात, मात्र सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अजित दादांच्या कारखान्याचा जेवढा टर्नओव्हर आहे. तेवढा आमच्या ओबीसींच्या महामंडळाचा निधीदेखील तेवढा नाही, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत केली.  शनिवारी (दि. ३१ मे) रात्री हाके यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांच्या एका कारखान्याची उलाढाल आहे. तेवढाही निधी महामंडळाला मिळत नसल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. जर राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी १ टक्केच्या वर निधी दिला असेल तर मी माझे आरोप मागे घेतो, असेदेखील हाके यावेळी म्हणाले.            

अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण आज मी बारामतीत आलो आहे, मला रोखून दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले. अजित पवार केवळ आर्थिक नियोजन करतात. सामाजिक न्यायाची समता या पोल्ट्री वाल्याला काय कळणार? कायद्याने बंधन असताना ६५० कोटी एससी, एसटी समाजाचा निधी वळवला गेला. महाज्योतीला का पैसे दिले जात नाहीत? सारथीला एवढा निधी कसा दिला जातो? भटक्या विमुक्त महामंडळाला ५० कोटी अपेक्षित होता. पण दिले नाहीत. केवळ सत्तेतून पैसे कमवायचे आणि निवडणूक जिकायची एवढंच यांचे सूत्र आहे.

अजित पवारांनी अर्थ खात्यावर नैतिकता दाखवू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं लक्ष्मण हाके म्हणाले. तुमचे कारखाने बंद पडले तर लगेच निधी मिळतो मग ओबीसींना वेगळा न्याय का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अजित पवार सत्तेत असतात. त्यामुळे अजित पवारांचा किंगमेकर शरद पवारच आहेत. गोरगरिबांच्या डोक्यावर जे मिरे वाटतात आम्ही त्यांनाच बोलणार असल्याचे हाके म्हणाले.

Web Title: Ajit Pawar is not providing funds for social justice schemes; Laxman Haake direct allegation