लग्नाच्यावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं- अजित पवार

By Admin | Updated: September 17, 2016 16:36 IST2016-09-17T16:00:13+5:302016-09-17T16:36:35+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांवर टीका केली आहे.

Ajit Pawar has to cover the reservation at the time of marriage | लग्नाच्यावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं- अजित पवार

लग्नाच्यावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं- अजित पवार

ऑनलाइन लोकमत

बारामती,दि.17- राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्याने तोंड वर काढलं आहे. मराठा आरक्षणाच्या गाजत असलेल्या मुद्द्यावर बोलताना  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांवर टीका केली आहे.  ‘आरक्षण अनेकांना  पाहिजे असतं मात्र, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा सर्वजण आरक्षण लपवतात आणि आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात’ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.शनिवारी बारामती येथील कार्यक्रमात  ते बोलत होते.
 
माझ्यासह सगळ्यांना आरक्षण पाहिजे, पण लग्नसमारंभाची वेळ आली की  सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कडूतले नाही, आम्ही किती वरच्या दर्जाचे आणि श्रेष्ठ आहोत हे दाखविण्यासाठी लोक खटाटोप करतात.असं सांगत पवारांनी आरक्षणाच्या दुसऱ्या बाजूवर बोट ठेवलं .
 
एकीकडे मराठा समाज आरक्षण मुद्यावर आक्रमक झाला असताना अजित पवारांनी केलेले हे वक्तव्या त्यांना चांगलंच भोवू शकतं. 

Web Title: Ajit Pawar has to cover the reservation at the time of marriage