शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीची उमेदवारी आक्षेपानंतरही कायम

By admin | Updated: October 11, 2015 04:23 IST

चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीन अपत्य असतानाही एका प्रभागातून स्वत: आणि दुसऱ्या प्रभागातून आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

चाकण : चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीन अपत्य असतानाही एका प्रभागातून स्वत: आणि दुसऱ्या प्रभागातून आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बाबत उमेदवारांनी शुक्रवारी झालेल्या छाननीत आक्षेप घेतले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात येणार आहे. शुक्रवारी चाकण नगर परिषदेच्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यात संबंधितास तीन अपत्य असल्याचा आरोप अन्य संबंधित प्रभागातील उमेदवारांनी केला होता. या बाबत हरकती घेताना संबंधित उमेदवारास जन्मदिनांक २३/०७/१९९८ रोजी मुलगा, जन्मदिनांक २०/०१/२००० रोजी मुलगी; तर जन्मदिनांक ०८/११/२००२ रोजी मुलगा अशी तीन अपत्य असून, या संबंधीचे पुरावे नगर परिषद कार्यालयातून शासन दरबारी सादर करण्यात आले. मात्र, संबंधित उमेदवाराने नंतर पुणे महानगरपालिकेतून मिळविलेल्या शासकीय परिपत्रकापूर्वीच्या जन्म तारखेच्या दाखल्याचा संदर्भ गृहीत धरण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आणि संबंधितांच्या उमेदवारी अर्जांवर घेण्यात आलेले आक्षेप निकाली काढण्यात आले. शासकीय परिपत्रकानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविता येत नाही. नियम काय सांगतो?राज्य निवडणूक आयोगाचे तत्कालीन सचिव बी. जी. वीर यांच्या सुधारित शासकीय परिपत्रकानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविता येत नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून अशा सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अपात्र घोषित केले जाऊ शकते.तक्रारीची दखल नाहीया बाबत चाकण नगर परिषदेच्या संबंधित प्रभागातील अन्य उमेदवारांनी सांगितले की, आम्ही या बाबत नगर परिषद कार्यालयातील अधिकृत दाखले प्रशासनाच्या समोर ठेवले ; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. या उलट नंतर पद वाचविण्यासाठी महानगरपालिकेतून मिळविलेला चुकीचा दाखला, खाडाखोड असलेले प्रतिज्ञापत्र गृहीत धरण्यात आले आहे. या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.