शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३२ तासांनी वीजपुरवठा सुरळीत

By admin | Updated: May 30, 2014 05:01 IST

विकासनगर परिसरात मंगळवारी वादळी पावसानंतर खंडित झालेला वीजपुरवठा ३२ तासांनी सुरू झाला.

किवळे : विकासनगर परिसरात मंगळवारी वादळी पावसानंतर खंडित झालेला वीजपुरवठा ३२ तासांनी सुरू झाला. मात्र, पुन्हा गुरुवारी सहा तास वीजपुरवठा बंद ठेवून महावितरणने गुरुवारपर्यंत ३८ तास वीज पुरवठा बंद ठेवून नागरिकांना अक्षरश: हैराण केले. भूमिगत केबलमध्ये निर्माण झालेला दोष दूर करण्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने सलग ३२ तास वीजपुरवठा खंडित राहिला असून, महावितरणच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी वीजपुरवठा खंडित करणार नाही, असे आश्वासन देऊनही ते न पाळल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासनगरच्या काही भागात मंगळवारी वादळी पावसाने विद्युतवाहिन्या तुटल्या होत्या. त्या भागातील वीजपुरवठा मंगळवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आला होता. मात्र उर्वरित मोठी गृहसंकुले, बहुमजली इमारती असणार्‍या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. या भागात विजेचे काही ठिकाणी एक, तर काही ठिकाणी दोन फेज गुल होते. याबाबत मंगळवारी रात्री संबंधित अधिकार्‍यांनी, दोष सापडत नाही; बुधवारी सकाळी अर्ध्या तासात काम होईल, असे सांगितले होते. मात्र, बुधवारी सकाळी वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी संपर्क साधला होता. मात्र दुरुस्तीच्या कामाबाबत चालढकल होत असल्याने मिळालेल्या वेगवेगळ्या उत्तरांमुळे स्पष्ट झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी भोसरी व निगडी प्राधिकरण येथील डी. पी. पेठकर व संजय घोडके या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधल्याने वेगाने सूत्रे हलली. महामार्गाजवळ भूमिगत केबलमध्ये असणारा दोष शोधण्यात आला व कामाला सुरुवात झाल्यानंतर स्थानिक शाखा अधिकारी कुहार्डे व स्थानिक नागरिकांनी जेसीबी यंत्र व इतर मदत उपलब्ध करून दिल्याने केबल दुरुस्ती बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, गुरुवारी पुन्हा वीजपुरवठा खंडित न करण्याबाबत विनंती करूनही तो बंद ठेवल्याने नागरकांची गैरसोय झाली. (वार्ताहर )