शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पाळणाघरांना  ‘कक्षे’त आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 22:00 IST

राज्य शासनाने ठरवून दिलेले निकष आणि नियम या पाळणाघरांना बंधनकारक करण्यात येणार...

ठळक मुद्देपत्र पाठविणार : सुरक्षा मानकांसह आरोग्य आणि अन्य निकषांची होणार तपासणी

पुणे : शहरातील पाळणाघरांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने शहरातील पाळणाघरांना कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला असून खासगी आणि अनुदानित पाळणाघरांची नोंदणी केली जाणार आहे. राज्य शासनाने ठरवून दिलेले निकष आणि नियम या पाळणाघरांना बंधनकारक करण्यात येणार असून यामुळे पाळणाघरांवर नियंत्रण ठेवणे पालिके ला शक्य होणार आहे. हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांपासून आजी-आजोबा दूर रहात असतात. अशा घरांमधील पती-पत्नी नोकरी करीत असल्याने मुलांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होते. यासोबतच परगावाहून पुण्यात आलेल्या कुटुंबांमधील महिला आणि पुरुष दोघेही नोकरी करीत असतात. त्यांच्यापुढेही मुलांकडे पहायला कोणी नसल्याने अडचणी येतात. त्यामुळे शहरातील सर्वच भागांमध्ये पाळणाघरे सुरु झालेली पहायला मिळत आहेत. ही संख्या झपाट्याने वाढत चालली असून पाळणाघरांकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. परंतू, अनेकदा तेथील मुलांना चांगल्या सुविधा आणि वागणूक मिळतेच असे नाही. त्यामुळे पालकही अनेकदा चिंतेमध्ये असतात. अनेकदा मुलांना मारहाणीच्या घटना घडतात. यावर नियंत्रण आणण्याकरिता शासनाने नियमावली तयार केली आहे. ही नियमावली आता पाळणाघरांना लागू होणार आहे. केंद्र शासनाने राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजनेचे नाव बदलून राष्ट्रीय पाळणाघर योजना असे केले आहे. राज्यभरात स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांमार्फत चालविल्या जाणाºया पाळणाघरांसाठी कार्यपद्धती लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीच्या ठरावाला महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार, पालिका हद्दीत ज्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांना पाळणाघरे चालवायची आहेत किंवा चालविण्यात येत आहेत अशा सर्वांकडून पालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. पाळणाघर चालकांनी २ डिसेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रे व छायाचित्रासह हे प्रस्ताव सादर क रावे लागणार आहेत. या योजनेंतर्गत चालविल्या जाणाºया पाळणाघरांसाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ३० टक्के तर चालकाचा १० टक्के सहभाग असणार आहे. यानिमित्ताने पालिकेकडे शहरातील सर्व पाळणाघरांची माहिती गोळा होणार आहे. यासोबतच पाळणाघरांमध्ये नियमांचे पालन होते की नाही, आरोग्य सुविधा, लहान मुलांची काळजी, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, मनुष्यबळ प्रशिक्षित आहे की नाही याकडे लक्ष देण्यात येणार आहे. या पाळणाघरांंना नोंदणी प्रमाण पत्र देण्यात येणार आहे. पालिकेच्या समुह संघटिकांना आपापल्या भागातील पाळणाघरांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. अधिकाधिक पाळणाघर चालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन पालिकेचे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त सुनिल इंदलकर यांनी केले आहे. 

---------------------------------------------------------- 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका