शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात टाकलेल्या ‘ त्या ’ जुळ्या मुलांच्या पालकांचा पत्ता सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 21:05 IST

गरीबीमुळे सोडले वाऱ्यावर : प्रेम संबंधातून जन्माला आली होते जुळे मुले

ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांनी या मुलांचा वाचवला होता प्राण

पाषाण: चतु:श्रृंगी पोलिसांनी पाषाण तलावाच्याजवळ कचरा कुंडीमध्ये मिळून आलेल्या बेवारस जुळया बालकांच्या माता पित्यांचा अथक प्रयत्न करून शोध घेतला. प्रेमसंबंधमधून या मुलांचा जन्म झाला असल्याची बाब समोर आली आहे. चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये १४ जानेवारीला पाषाण तलावाजवळ महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर कचराकुंडीमध्ये अज्ञात इसमाने दोन जिवंत जुळी नवजात बालके (अर्भक) एक स्त्री जातीचे व एक पुरुष जातीचे बालक वाऱ्यावर सोडून त्यांना सांभाळण्यास असमर्थता दाखवून निघून गेले होते. यानंतर या परिसरातील नागरिकांनी या मुलांचा प्राण वाचवला होता.

दरम्यान चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपास पथकाने या घटनेचा तपास केल्यानंतर पुणे शहरातील हॉस्पिटलला भेटी देऊन माहिती घेतली. या तपासात जननी नर्सिंग होम कर्वेनगर पुणे येथे १३ जानेवारीला एका इसमाने महिलेला डिलिव्हरीसाठी अ‍ॅडमिट केले होते. या महिलेची पहाटे ४.१० वा.डिलेव्हरी झाली असता तिला एक मुलगा व एक मुलगी झाली. बुधवारी (दि.१४) हॉस्पीटलमध्ये कोणास काही एक न सांगता दोन्ही मुलांना घेवून निघून गेले होते. तपासात ही माहितीसमोर आल्याने महिलेवर संशय बळावल्याने तिने सांगितलेल्या पत्यावर शोध घेतला. ही महिला मागील एक वर्षापासून तेथे राहत नसल्याचे समजले. त्या्नंतर या महिलेचा शोध घेत असताना पोलीस नाईक प्रकाश आव्हाड व सचिन कांबळे यांना मिळालेल्या माहितीवरुन व पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मळे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून ही महिला वडगाव ब्रदुक भागात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी,पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख,सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराडे यांना देवून त्यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे ,पोलीस निरीक्षक माया देवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मोहन जाधव, राकेश सरडे, यांच्या पथकाने सदर महिला व तिचा प्रियकर यांना वडगाव येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पाषाण तलावाच्या घटनेबाबत चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. दोघांचे प्रेमसंबंधातून सदरचे अपत्य जन्माला आली. सदर महिलेस पहिल्या पतीपासुन तीन मुली आहेत. मुलांना पाषाण तलाव उदयानाजवळ येथे रस्त्याचे कडेला कचरा कुंडीजवळ बुधवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सोडून दिल्याचे सांगितले. याबाबत आरोपीला चतुश्रृंगी पोलिसांनी  अटक केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी