शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ठिय्या मांडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 20, 2015 00:58 IST

धिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याची माहिती सेवकवर्ग विभागाचे प्रमुख मंगेश जोशी यांनी गुरुवारी मुख्य सभेला दिली.

पुणे : महापालिकेतील विविध विभागांमध्ये वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या तसेच दुसऱ्या खात्यात बदली होऊनही रुजू न होणाऱ्या ५१ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याची माहिती सेवकवर्ग विभागाचे प्रमुख मंगेश जोशी यांनी गुरुवारी मुख्य सभेला दिली. महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती दुसऱ्या विभागामध्ये असतानाही प्रत्यक्षात वर्षानुवर्षे ते बांधकाम नियंत्रण विभागामध्ये कार्यरत आहेत. याबाबत नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी प्रश्न विचारला. बदली होऊनही संबंधित अधिकारी दुसऱ्या खात्यात रुजू झाले नाहीत्,ा त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा नागपुरे यांनी केली. यावर उत्तर देताना मंगेश जोशी यांनी सांगितले की, ‘‘शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याने ते अधिकारी बदलून गेले नव्हते. त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला.’’महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यांसंदर्भातील धोरणास २१ जानेवारी २००४ रोजी मुख्य सभेने मान्यता दिली. त्यानुसार एकाच खात्यात सलग ३ वर्षे सेवा झाल्यानंतर अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी. तसेच खात्याच्या एकूण पदांपैकी दर वर्षी जास्तीत जास्त २० टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात असे धोरण निश्चित केले आहे. कार्यकारी अभियंता दर्जाच्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती पाणीपुरवठा विभाग, आयुक्त कार्यालय, गवनि येथे असताना ते प्रत्यक्षात बांधकाम नियंत्रण विभाग, मेट्रो, डीपी सेलमध्ये कार्यरत आहेत. उपअभियंता, १० शाखा अभियंता व १४ कनिष्ठ अभियंता (बांधकाम) दर्जाचे ११ अधिकारी दुसरीकडे नियुक्ती असताना बांधकाम विभागात ठाण मांडून आहेत.प्रशासनाकडून दिशाभूल, नगरसेवक संतप्तबदली होऊनही रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही याबाबत नगरसेवकांनी वारंवार विचारणा करूनही त्याचे व्यवस्थित उत्तर प्रशासनाला देता आले नाही. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माधुरी सहस्रबुद्धे यांनी त्याला जोरदार आक्षेप घेऊन व्यवस्थित उत्तर देण्यास सांगितले. मात्र कारवाई का केली नाही, याचे ठोस स्पष्टीकरण प्रशासनाला देता आले नाही. नगर अभियंत्यावरटीकेची झोडनगर अभियंता प्रशांत वाघमारे बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करीत नाहीत, त्यामुळेच ते अधिकारी वर्षानुवर्षे बांधकाम विभागात कार्यरत आहेत. यावर नगरसेवकांनी टीकेची झोड उठविली. वाघमारे सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांच्याकडून खुलासा मिळू शकला नाही. त्यांच्याकडून याबाबतचा सविस्तर खुलासा पुढील मुख्य सभेत घेण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.