शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

कोरे रेशनकार्ड गहाळ झाल्यास कारवाई

By admin | Updated: May 30, 2014 04:51 IST

याकरिता संबंधित तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी, शिधावाटप अधिकारी,कर्मचारी यांना जबाबदार धरले जाईल,

पुणे : कोरे रेशनकार्ड गहाळ होण्याच्या वारंवार घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊन त्यांचा गैरवापर होऊ नये, याकरिता संबंधित तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी, शिधावाटप अधिकारी, संबंधित कर्मचारी यांना याकरिता थेटपणे जबाबदार धरले जाईल, असे परिपत्रक अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून काढण्यात आले आहे. पुणे शहरातील ह परिमंडळ कार्यालयातून कोरे रेशनकार्ड गहाळ करून त्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे तसेच नियमबाह्य पद्धतीने रेशनकार्ड वितरीत केले जात असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी लीगल राइट सोसायटीचे अध्यक्ष अनुप अवस्थी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई-मेलद्वारे केली होती. त्यास उत्तर देताना याबाबत काढण्यात आलेल्या शासन आदेशाची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अवस्थी यांना पाठविण्यात आली आहे. नवीन रेशनकार्ड वितरीत करताना काय दक्षता घ्यावी, याबाबतच्या सविस्तर सूचना २९ जून २०१३ च्या शासनाच्या परिपत्रकामध्ये करण्यात आल्या आहेत. कोरे रेशनकार्ड सुरक्षित जागी ठेवले जावे तसेच ते चुकीच्या पद्धतीने कार्यालयाने जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार, शिधावाटप अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. अधिकार्‍यांनी प्रत्यक्षात वापरलेल्या व कोर्‍या रेशनकार्डांचा ताळमेळ दरमहा घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही पुणे शहरामध्ये कोर्‍या शिधापत्रिका गहाळ करून त्यांची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेण्याचे सूचना परिपत्रकामध्ये देण्यात आल्या आहेत. कोरे रेशनकार्ड गहाळ करून मुख्यमंत्री विलासराव देशमुख, कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन यांच्या नावे रेशनकार्ड बनविल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. निवासी पत्त्याचा पुरावा म्हणून रेशनकार्ड ग्राह्य धरू नये, असे त्यावर नमूद करण्यात आले आहे. मात्र, तरीही अनेक शासकीय कार्यालयांमध्ये निवासी व उत्पन्नाचा पुरावा म्हणून रेशनकार्डच ग्राह्य धरले जाते. त्यामुळे रेशकार्डाबाबत जास्तीतजास्त सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)