शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार, लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला १५ वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाविद्यालयात दोघांची ओळख झाल्यानंतर त्याने मुलीला, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सज्ञान झाल्यावर तुझ्याशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाविद्यालयात दोघांची ओळख झाल्यानंतर त्याने मुलीला, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार, असे वचन दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्याच्यापासून ती गर्भवती राहिली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला १५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.

ऋषीराज बाबासाहेब शेळके (वय-२२,रा.भांडगाव)असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१७ मध्ये तक्रार दाखल केली होती. आरोपी व पीडित मुलीची येरवडा येथील एका महाविद्यालयात ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक पीडितेला देत दोघे एकमेकांशी फोनवर बोलू लागले. तू सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार, असे त्याने वचन दिले. त्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये त्याने मुलीस एका लॉजवर नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला व तिला पुन्हा महाविद्यालयात सोडले. त्यानंतर थोड्याच दिवसात मुलीस दिवस गेल्याचे कुटुंबीयांना समजले व तिला खासगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला; मात्र गर्भपाताची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली व पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. त्यात तिने आरोपीमुळे मला दिवस गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून गर्भाचा डीएनए तपासणीस पाठवून खातरजमा केली.

सरकारी पक्षातर्फे या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयीन सुनावणीत पीडित बालिका अज्ञान असल्याचे व तिचा गर्भपात व रासायनिक प्रयोगशाळा तपासणीचा डीएनए अहवालावरून आरोपी हाच गर्भाचा जनुकीय पिता असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अरुंधती ब्रहमे यांनी केला. न्यायालयाने पीडित मुलगी व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य मानत आरोपीला बलात्कारप्रकरणी १२ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली १५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १५ हजार दंडाची शिक्षा दिली. दोन्ही शिक्षा आरोपीस एकत्र भोगायच्या आहेत, तसेच फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या केसचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांनी केला.