शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: July 4, 2014 06:48 IST

भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रवीण लक्ष्मण सोनवणे (वय ३२, रा. कावेरीनगर, पोलीस वसाहत, वाकड) या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला.

पिंपरी : भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रवीण लक्ष्मण सोनवणे (वय ३२, रा. कावेरीनगर, पोलीस वसाहत, वाकड) या वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चिंचवड येथील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यापासून काही अंतरावर घडली. याप्रकरणी सुंदर दगडू रोकडे (४६, रा. चिखली) या मोटारचालकाला अटक केली आहे. फौजदार व्ही. व्ही. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त बंगल्यापासून जवळच एक रिक्षा उभी होती. त्या रिक्षाशेजारीच सोनवणे होते. दरम्यान, मोरवाडीकडून केएसबी चौकाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीने रिक्षाला धडक दिली, त्यामुळे ही रिक्षा सोनवणे यांच्या अंगावर गेली. या अपघातात सोनवणे गंभीर जखमी झाले. दरम्यान, रस्त्याने जात असलेल्या मारुती नरवडे या रिक्षाचालकाने त्यांना उपचारासाठी तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, उपायुक्त राजेंद्र माने, वाहतूक विभागाचे उपायुक्त विश्वास पांढरे, सहायक आयुक्त महेंद्र रोकडे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. मूळचे बीड जिल्ह्यातील धारगाव येथील सोनवणे २००७ साली पोलीस दलात भरती झाले होते. सध्या ते पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत होते. सध्या वाकड येथील पोलीस वसाहतीत आई व पत्नीसमवेत राहणाऱ्या प्रवीण यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांचे बंधूही पोलीस दलात आहेत. प्रवीण यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. गुरुवारी सायंकाळी थेरगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. (प्रतिनिधी)