शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात अपघात; दुचाकीवरील मुलगी ट्रकच्या चाकाखाली, वडिलांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:10 IST

अपघातात १२ वर्षाच्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यात ८ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे

पुणे : जेजुरी खंडोबाचे देवदर्शन करून परतताना दुचाकीवरून निघालेल्या वडील आणि मुलांवर काळाने घाला घातला. दिवे घाटात पाठीमागून आलेल्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. दुर्देवाने बारा वर्षाची मुलगी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यात ८ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

सुंदर कैलास गंगावणे (वय ३३), मुलगी अनन्या सुंदर गंगावणे (वय १२, दोघे रा. उंड्री पिसोळी, कात्रज कोंढवा रोड) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. सोहम गंगावणे (वय ८) हा जखमी झाला आहे. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंत बाबुराव मलकापूरे (वय ३२, रा. नागेवाडी, ,ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) असे अटक झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मामेभाऊ सुंदर गंगावणे हे आपली मुलगी अनन्या व सोहम यांना घेऊन रविवारी खंडोबाच्या देवदर्शनासाठी जेजुरीला गेले होते. तेथून ते मध्यरात्री सव्वा बारा वाजता परत येत होते. दिवे घाटातील देवाची उरुळी येथे पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात सुंदर गंगावणे यांच्या डोक्याला मार लागला. अनन्या गंगावणे ही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. सुंदर गंगावणे यांना जमलेल्या लोकांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Father, Daughter Die in Dive Ghat Accident

Web Summary : A father and daughter died in Dive Ghat after a truck hit their bike returning from Jejuri. The daughter died instantly, and the father succumbed to injuries at the hospital. A younger son was injured. Police arrested the truck driver.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईकhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी