देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात अपघात; दुचाकीवरील मुलगी ट्रकच्या चाकाखाली, वडिलांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:10 IST2026-03-31T17:09:43+5:302026-03-31T17:10:08+5:30

अपघातात १२ वर्षाच्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यात ८ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे

Accident at Dive Ghat while returning from Devdarshan; Girl on bike falls under truck, father dies after sustaining serious injuries | देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात अपघात; दुचाकीवरील मुलगी ट्रकच्या चाकाखाली, वडिलांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात अपघात; दुचाकीवरील मुलगी ट्रकच्या चाकाखाली, वडिलांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

पुणे : जेजुरी खंडोबाचे देवदर्शन करून परतताना दुचाकीवरून निघालेल्या वडील आणि मुलांवर काळाने घाला घातला. दिवे घाटात पाठीमागून आलेल्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. दुर्देवाने बारा वर्षाची मुलगी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यात ८ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

सुंदर कैलास गंगावणे (वय ३३), मुलगी अनन्या सुंदर गंगावणे (वय १२, दोघे रा. उंड्री पिसोळी, कात्रज कोंढवा रोड) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. सोहम गंगावणे (वय ८) हा जखमी झाला आहे. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंत बाबुराव मलकापूरे (वय ३२, रा. नागेवाडी, ,ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) असे अटक झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मामेभाऊ सुंदर गंगावणे हे आपली मुलगी अनन्या व सोहम यांना घेऊन रविवारी खंडोबाच्या देवदर्शनासाठी जेजुरीला गेले होते. तेथून ते मध्यरात्री सव्वा बारा वाजता परत येत होते. दिवे घाटातील देवाची उरुळी येथे पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात सुंदर गंगावणे यांच्या डोक्याला मार लागला. अनन्या गंगावणे ही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. सुंदर गंगावणे यांना जमलेल्या लोकांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

Web Title : दुखद: दिवे घाट दुर्घटना में पिता-पुत्री की मौत

Web Summary : जेजुरी से लौटते समय दिवे घाट में ट्रक की टक्कर से पिता और पुत्री की मौत हो गई. बेटी की मौके पर ही मौत हो गई, जबकि पिता ने अस्पताल में दम तोड़ दिया. एक छोटा बेटा घायल है. पुलिस ने ट्रक ड्राइवर को गिरफ्तार कर लिया है।

Web Title : Tragedy Strikes: Father, Daughter Die in Dive Ghat Accident

Web Summary : A father and daughter died in Dive Ghat after a truck hit their bike returning from Jejuri. The daughter died instantly, and the father succumbed to injuries at the hospital. A younger son was injured. Police arrested the truck driver.