शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक

By नितीश गोवंडे | Updated: June 23, 2025 17:13 IST

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला, त्यावेळी उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली

पुणे : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील वडगाव उड्डाणपुलावर घडली. भरधाव ट्रकने उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली. अपघातात दोन कारचे नुकसान झाले, तसेच दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली.

किरण पवार (२५, रा. श्रमसाफल्य काॅलनी, कर्वेनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार यश जयप्रकाश किरदत्त (२५, रा. श्रमसाफल्य काॅलनी, कर्वेनगर) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ट्रकचालक महंतेश श्रीकांत अंदोडगी (३७, रा. गोलसर, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली. याबाबत यश किरदत्त याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार यश किरदत्त आणि त्याचा मित्र किरण पवार हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावरून रविवारी (दि. २२) पहाटे सव्वापाचच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला. त्यावेळी उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार यश अणि त्याचा मित्र किरण यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच किरण याचा मृत्यू झाला होता. पसार झालेला ट्रकचालक अंदोडगी याला ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक मालुसरे पुढील तपास करत आहेत.

उड्डाणपुलावर तिसरा अपघात...

वडगाव उड्डाणपुलावर दोन महिन्यांपूर्वी मित्रांसोबत पार्टी करुन निघालेल्या कारचालकाने दुचाकीला धडक दिली होती. अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर भरघाव कार उड्डाणपुलावरून रस्त्यावर कोसळली होती. अपघातात कारचालकासह त्याच्याबरोबर असलेले मित्र जखमी झाले होते. यापूर्वी वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूcarकारbikeबाईक