शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!

By नारायण बडगुजर | Updated: October 10, 2024 22:00 IST

प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : प्रेयसीवर चाकूने हल्ला करत प्रियकराने स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी चार वाजता पिंपरीतील एका लॉजमध्ये घडली. प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नीतेश नरेश मिनेकर (३४, रा. येरवडा) असे प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतेश हा २८ वर्षीय तरुणीसोबत गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरीतील एका हॉटेलमध्ये आले. त्यांनी आधारकार्ड दाखवून एक खोली घेतली. त्यानंतर काही मिनिटांतच खोलीमधून तरुणीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी पळत खोली समोर गेले. त्यांनी दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र, कोणीही खोलीचा दरवाजा उघडला नाही. 

कर्मचाऱ्यांनी तातडीने डायल ११२ क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी, दरवाजा वाजवत, आम्ही पोलिस आहोत, दरवाजा उघडा, असे सांगितले. त्यानंतर नीतेश याने, पाच मिनिट थांबा, उघडतो दरवाजा, असे सांगितले. मात्र, काही वेळ जाऊनही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. नीतेशने पंख्याला गळफास घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तर, तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पोलिसांनी तातडीने तरुणीला रुग्णालयात दाखल केले.

नीतेश याने तरुणीवर हल्ला का केला, तसेच स्वत: गळफास का घेतला, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे